Sunday, June 23, 2024
Homeमुख्य बातम्याManoj Jarange Patil Sabha : जालन्यात मनोज जरांगे पाटलांच्या सभेला तुफान गर्दी;...

Manoj Jarange Patil Sabha : जालन्यात मनोज जरांगे पाटलांच्या सभेला तुफान गर्दी; संबोधनाकडे महाराष्ट्राचे लक्ष

जालना | Jalna

- Advertisement -

जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे आज मराठा समाजाला आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची सकल मराठा समाजाच्या (Maratha Samaj) वतीने जंगी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी काल रात्रीपासूनच कार्यकर्ते आणि लोकांची मोठी गर्दी झाली असून सभेचे मैदान संपूर्ण भरल्याचे पाहायला मिळत आहे….

मनोज जरांगेंची सभा १०० एकर मैदानावर होणार असून त्यासाठी ८० एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर या सभेसाठी दहा हजार स्वयंसेवक हजर असून पोलीस बंदोबस्त देखील मोठय प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे. तसेच मनोज जरांगेंच्या सभेसाठी अयोजकांसोबतच प्रशासन देखील तयार झाले असून या सभेवर खबरदारी म्हणून ड्रोन कॅमेऱ्याची नजर ठेवण्यात आली आहे.

तर सभास्थळी दहा अग्निशमन दलाच्या गाड्या ठेवण्यात आल्या असून यामध्ये ११० रुग्णवाहिका त्यात ३५ कार्डीयाक रुग्णवाहिका असणार आहेत. तसेच ४० बेडस, ३०० डॉक्टर, ३०० नर्सिंग स्टाफ ठेवण्यात आला आहे. याशिवाय १२ हजार लिटरचे ५० पाणी टँकर या सभेच्या मैदानात असणार आहेत. तर ५ लाख पाणी बॉटल्स, १००० लाऊड स्पीकर, २० एलइडी स्क्रीनची तयारी या सभेसाठी करण्यात आली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे ४० दिवसांचा वेळ मागवून घेतला होता. या काळात आपण आरक्षणचा मुद्दा मार्गी लावू असे आश्वासन देखील राज्य सरकारने दिले होते. राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे देखील घेतले होते. येत्या ४० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) न मिळाल्यास पुन्हा एकदा आपण बेमुदत उपोषण सुरू करणार, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर आता जरांगे यांनी सरकारला दिलेला ४० दिवसांचा अवधी आज संपला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आजच्या सभेत काय बोलणार? आरक्षणाबाबत मराठा समाजाची काय भूमिका मांडणार याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या