Saturday, July 27, 2024
HomeनाशिकVideo : 'बम बम भोले'च्या जयघोषाने दुमदुमली त्र्यंबकनगरी

Video : ‘बम बम भोले’च्या जयघोषाने दुमदुमली त्र्यंबकनगरी

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्याने देशभरातून भाविक (Devotee) याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्यातच आता सध्या श्रावण महिना सुरु असल्याने या महिन्यात त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) भाविकांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल पाहायला मिळत आहे…

- Advertisement -

Asia Cup 2023 : भारत आज नेपाळशी भिडणार; सामन्यावर पावसाचं सावट, भारतासमोर ‘करो या मरो’ची स्थिती

त्र्यंबकेश्वर येथे श्रावणातील पहिल्या सोमवारी (First Monday of Shravan) कमी प्रमाणावर गर्दी दिसत होती. त्यानंतर दुसऱ्या सोमवारी थोडी गर्दी वाढल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर आज तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरला भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे लाखो भाविक त्र्यंबकनगरीत दाखल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

काल रविवार (दि.३ सप्टेंबर) रोजी भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आणि ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेकरिता हजारो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले होते. यानंतर आज सकाळपासून त्र्यंबकनगरी भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली असून प्रदक्षिणा मार्गावर (Circuitous Route) भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह झाला ‘बाबा’; मुलाचे ठेवले ‘हे’ नाव

तर प्रदक्षिणा मार्गावर भाविकांकडून बम बम भोलेचा जयघोष केला जात आहे. तसेच काही सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी श्रावण सोमवारनिमित्त भाविकांसाठी खिचडी, चहा आणि केळांचे वाटप केले जात आहे. त्यामुळे भाविकांनी या प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसत आहे.

त्याचप्रमाणे त्र्यंबक शहरातील (Trimbak City) कुशावर्त कुंड आणि त्र्यंबकराज मंदिर परिसरात देखील भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. याठिकाणाहूनच खऱ्या अर्थाने ब्रम्हगिरीची फेरी सुरु होत असल्याने भाविकांनी कुशावर्त कुंडावर हातपाय किंवा अंघोळीसाठी तर त्र्यंबकराज मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे.

Chandrayaan 3 च्या काऊंटडाऊनचा आवाज हरपला, ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं निधन

तसेच त्र्यंबक शहरात आणि प्रदक्षिणा मार्गासह इतर कुठल्याही ठिकाणी अनुचित घटना घडून नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ६०० पोलिसांचा (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय प्रदक्षिणा मार्गावर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयांतर्गत कोजुली, नमस्कारवाडी, सापगाव फाटा, त्र्यंबकेश्वर मंदिर व उपजिल्हा रुग्णालय या पाच ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

बबनराव पाचपुतेंचे पुतणे साजन पाचपुते आज ठाकरे गटात प्रवेश करणार

- Advertisment -

ताज्या बातम्या