मुंबई / प्रतिनिधी Mumbai
आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार ऑलिंम्पिंक, पॅराऑलिंम्पिंक सुवर्ण पदक विजेत्यांना पाच कोटी रुपये, रौप्य पदकासाठी तीन कोटी, कांस्य पदकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पन्नास लाख, तीस लाख आणि वीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी सुवर्ण पदक विजेत्यांना तीन कोटी रुपये, रौप्य पदकासाठी दोन कोटी, कांस्य पदकासाठी एक कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे तीस लाख, वीस लाख व दहा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. एशियन गेमसाठी सुवर्ण पदक विजेत्यांना एक कोटी रुपये, रौप्य पदकासाठी पंच्याहत्तर लाख, कांस्य पदकासाठी पन्नास लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे दहा लाख, सात लाख पन्नास हजार व पाच लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. वरिष्ठ कॉमनवेल्थसाठी सूवर्ण पदक विजेत्यांना सत्तर लाख रुपये, रौप्य पदकासाठी पन्नास लाख, कांस्य पदकासाठी तीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे सात लाख, पाच लाख व तीन लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
युथ ऑलिंम्पिंकमधील सुवर्ण पदक विजेत्यांना ३० लाख रुपये, रौप्य पदकासाठी २० लाख, कांस्य पदकासाठी २० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे तीन लाख, दोन लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तसेच सांघिक खेळात ऑलिंम्पिंक, पॅराआलिंम्पिंकमध्ये सुवर्ण पदक विजेत्यांना ३ कोटी ७५ लाख रुपये, रौप्य पदकासाठी २ कोटी २५ लाख तर कांस्य पदकासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे ३७ लाख ५० हजार, २२ लाख ५० हजार आणि पंधरा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
सांघिक खेळात वरिष्ठ चॅम्पियनशीपमधील सुवर्ण पदक विजेत्यांना २ कोटी २५ लाख लाख रुपये, रौप्य पदकासाठी १ कोटी ५० लाख तर कांस्य पदकासाठी ७५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे २२ लाख ५० हजार, १५ लाख आणि ७ लाख ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. सांघिक खेळात एशियन गेममध्ये सुवर्ण पदक विजेत्यांना ७५ लाख रुपये, रौप्य पदकासाठी ५६ लाख २५ हजार तर कांस्य पदकासाठी ३७ लाख ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे ७ लाख ५० हजार, ५ लाख ६२ हजार ५०० रुपये आणि ३ लाख ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
सांघिक खेळात वरिष्ठ कॉमनवेल्थ स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्यांना ५२ लाख ५० हजार रुपये, रौप्य पदकासाठी ३७ लाख ५० हजार तर कांस्य पदकासाठी २२ लाख ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे ५ लाख २५ हजार, ३ लाख ७५ हजार रुपये आणि २ लाख २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. सांघिक खेळात युथ ऑलिंम्पिंकमधील सुवर्ण पदक विजेत्यांना २२ लाख ५० हजार रुपये, रौप्य पदकासाठी १५ लाख, तर कांस्य पदकासाठी ७ लाख ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे २ लाख २५ हजार, १ लाख ५० हजार रुपये आणि ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.