ओझे | वार्ताहर
तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करत असताना विस्तारीकरण इथेनॉल प्रकल्पाचे कर्ज हप्ते वेळेत परतफेड केली असून कारखान्यावर कोणतेही थकीत कर्ज नाही. कारखान्याने ऊस बिला पोटी संपूर्ण एफ आर पी अदा केले असून गेल्या आर्थिक वर्षात कादवा ला ६ कोटी ३२ लाख ५३ हजार रुपयांचा भरघोस नफा झाला असून कारखान्याचे अधिक भरभराटीसाठी जास्तीत जास्त उस गाळप होणे अत्यावश्यक आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.
कादवा सहकारी साखर कारखान्याची ५३ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन श्रीराम शेटे यांचे अध्यक्षतेखाली खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,खासदार भास्कर भगरे माजी आमदार रामदास चारोस्कर, जिल्हा बँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील, बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे, कैलास मवाळ, चांदवड बाजार समिती सभापती संजय जाधव, शिवसेनेचे सुनील पाटील, कादवाचे माजी संचालक शिवाजीराव जाधव, सुरेश डोखळे, विलास कड, प्रकाश वडजे, आदीसह सर्व संचालक व मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना श्रीराम शेटे यांनी गेल्या वर्षी इथेनॉलवर निर्बंध आल्याने अपेक्षित फायदा झाला नाही. मात्र
केंद्र सरकारने या वर्षी इथेनॉलला परवानगी दिल्याबद्दल आभार मानले. कारखान्याने कर्जाचे हप्ते वेळेत भरले असून कोणतेही कर्ज थकीत नाही.
आता कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप होणे गरजेचे असून त्यासाठी गाळप क्षमता वाढविणे गरजेचे आहे, त्यासाठी परवानग्या घेवून ठेवल्या असून त्यासाठी ऊस लागवड वाढण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेत विविध उपपदार्थ निर्मितीचे प्रयत्न सुरू असून इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित झाले असून त्या सोबतच सीएनजी, सिबीसी हायड्रोजन, पोटॅश निर्मिती प्रस्तावित आहे. मात्र, पूर्ण अभ्यास करूनच हे निर्णय घेतले जातील असे श्रीराम शेटे यांनी सांगितले. यावेळी सचिन बर्डे ,सुरेश डोखळे यांनी २००० चे आतील शेअर्स जमा करण्याचे धोरणास विरोध करत विविध प्रश्न उपस्थित केले.
प्रकाश शिंदे,जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, भालचंद्र पाटील, संपत कोंड, गंगाधर निखाडे, शिवानंद संधान,बाळासाहेब नाठे, हिरामण पाटील, सुभाष मातेरे, तानाजी पगार आदींनी चर्चेत भाग घेतला. चेअरमन श्रीराम शेटे यांनी सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. स्वागत संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले, सूत्रसंचालन अशोक शिंदे तर आभार संचालक सुकदेव जाधव यांनी मानले. यावेळी सभासद ,सर्व संचालक अधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांचा झाला सन्मान
कादवा सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात सर्वाधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यात खेडगाव येथील पांडुरंग शेटे, मोहाडी येथील कृष्णा पाटील, सुभाष सोमवंशी, अवनखेड येथील चिंतामण जाधव, मावडी येथील गोरख घुले, पिपळद येथील विजय लोंढे, चिंचखेड येथील दौलत संधान, चंद्रकला फुगट, मंजुळा फुगट, लखमापूर येथील संदीप दळवी, पाडे येथील शंकर नाठे, मडकीजांब येथील विठ्ठल ढुमने, करंजवन विलास जाधव कर्मचारी वर्गातून बापू शिंदे आदींचा सन्मान करण्यात आला. तसेच, महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार नरहरी झिरवाळ यांचा तसेच खासदार, भास्कर भगरे यांचा कारखान्या तर्फे सत्कार करण्यात आला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा