प्रफुुुल्ल कुलकर्णी
मानवाला परमेश्वराने प्रदान केलेला ‘हात व हाताचा आकार’ हा संपूर्ण प्राणी जगतात वैशिष्ठ्यपूर्ण आहे. हाताचा पंजा, त्यावरील चार बोटे, त्यात मधले मोठे व लांब, पहिले व तिसरे सरासरी एकसारखे व चौेथे सर्वांत छोटे. अंगठ्याला बोट म्हणत नाहीत. हाताच्या पंज्यावर अंगठा नसेल तर मानवाला त्याच्या हाताच्या बाकी बोटांचा उपयोग शून्य होय.
अंगठ्याची ताकद असामान्य आहे. अंगठा हाताच्या चारही बोटांवरून फिरतो. अंगठ्याने हाताला मजबूत पकड प्रदान होते. हाताची पांचही बोटे एकत्र केली कि एक वज्रमूठ तयार होते. शरिरविज्ञान शास्त्राप्रमाणे अंगठ्यात मुख्य रक्तवाहिनी येऊन पोहोचते. हातांच्या पंज्यांचे स्नायू मजबूत असतात. बोटांची पेरे बोटांमधील छोट्या छोट्या हाडांच्या ठेवणीमुळे दुमडले जातात. बोटे दुमडल्याने हाताला एकत्रित शक्ती मिळते. बोटांच्या टोकाला बाहेरच्या बाजूने नख रुपी हत्यार प्रदान केले आहे. बाकीच्या प्राण्यांमधील नखाच्या हालचाली होतात त्याप्रमाणे नख आत बाहेर येत नसेल तरी बोटांचे संवरक्षण होते व विविध कामांसाठी नखाचा कळत नकळत उपयोग होत असतो.
बोटांच्या आतून पहिले तर प्रत्येक बोटाला तीन-तीन पेरे दिसून येतात. काही अपवादात्मक एका बोटावर चार किंवा अंगठ्यावर दोनच पेरे असू शकतात. बोटांच्या पहिल्या पेर्यावर बोटांचे ठसे असतात. हे बोटांचे ठसे संपूर्ण जगात प्रत्येकाचे एकसारखे असू शकत नाहीत. बोटांवरील ठसे जन्मभर आहे तसेच राहतात. त्यात बदल होत नाही. बोटांवरील विविध प्रकारचे ठसे हे ज्या प्रकारचे आहेत त्याप्रमाणे मानवाचे कला कौशल्ये विकसित असतात किंवा ठश्यांच्या विविध प्रकारांच्या निरनिराळ्या गुणांमुळे मनुष्याच्या अंगी विविध क्षेत्रातील उपजत हुशारी प्रदान असते.
बोटांच्या ठशांचा व मानवी मेंदूचा संबंध शास्त्रज्ञांनी संशोधनाअंती सिद्ध केला आहे. मानवाच्या अंगी असलेले कलाकौशल्य बोटांवरील असलेल्या शंख, शुक्ती, चक्र सारख्या विविध ठशावरून ओळखता येते. हातावर मानवाच्या मेंदूकडून येणार्या सर्व मुख्य रक्तवाहिन्या प्रवाहित असतात. त्यामुळे हाताचा व मेंदूचा मानवी सर्व संवेदनांच्या दृष्टीने संबंध प्रस्थापित झालेला असतो. सर्व संवेदना ग्रहण करण्याचे स्थान म्हणजे बोटांची टोके होत.
हस्तसामुद्रिक शास्त्राप्रमाणे मानवाच्या सर्वात पहिल्या प्रथम येणार्या सर्व संवेदना ग्रहण करण्याचे स्थान म्हणजे बोटांची टोके होत. बोटांकडून संवेदना ग्रहण झाल्या क्षणी मानवी डोळे, कान व मेंदू यांच्या एकत्रित कार्याने संवेदना व त्याचे विश्लेषण होत असते. मानव ग्रहण करीत असलेल्या संवेदना ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बोटांच्या टोकांच्या ठेवणी नुसार असतात. बोटांची टोके निमुळते, टोकदार, गोलाई असलेले व चौकोनी आकाराचे असतात. या बोटांच्या टोकांवरून माणसाच्या अंगी असलेली संवेदनांची ग्रहण शक्ती किती परिपक्व आहे ते कळते. उदारणार्थ टोकदार बोटे असतील तर संवेदनांची ग्रहण शक्ती जलद असते. मागचा पुढचा विचार आणि संवेदनांचे ग्रहण व्यक्ती करते. बोटांची टोके जितकी बोथट असतील त्या प्रमाणात मानवी संवेदनांचे पृथकरण अचूक होत असते. म्हणजे संवेदना या बोथट आकाराच्या बोटांतून विश्लेषण करूनच ग्रहण केल्या जातात. महिलांची बोटांची टोके निमुळती व टोकदार असतात. म्हणूच बहुसंख्य महिला एखाद्या गोष्टीवर चटकन विश्वास ठेवतात. त्यांचेकडून संवेदनांचे ग्रहण विश्लेषण न करता त्यांचा विविध घटना व गोष्टींवर विश्वास ठेवला जातो.
हातावरील पाचही बोटांच्या खाली अनुक्रमे, पहिले गुरु, दुसरे शनी, तिसरे रवी व चौथे बुध ग्रहाचे असते. हातावरील अंगठ्यावर दोन ग्रहांचा प्रभाव असतो त्यात अंगठ्याच्या आतील भागात खालचा मंगळ व त्याच्या खाली शुक्र ग्रह या दोन ग्रहांचा मोठा प्रभाव अंगठ्यावर व अंगठ्याच्या पेरावर होत असतो. करंगळीच्या खाली बुध ग्रह असतो. त्याच्याच खाली हृदय रेषा मस्तक रेषेच्या मध्ये वरचा मंगळ ग्रह व मस्तक रेषेखाली करंगळीच्या सरळ रेषेत चंद्र ग्रहाला स्थान आहे.
बोटांतील पेर्यांमध्ये असलेले फुगीर सांधे व्यक्तीला विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता देतात. बोटांतील पेर्यांमध्ये असलेले फुगीर सांधे दोन ते तीन टक्के व्यक्तींच्या हातावर पाहावयास मिळतात. हे सांधे मनुष्याच्या ग्रहण शक्तीचे विचारपूर्वक विश्लेषण करतात. काहींच्या हातांवर एक ते तीन बोटांमध्ये सांधे असतात. हे सांधे विशेतः मधल्या बोटावर म्हणजे शनीच्या व त्याखालोखाल गुरु व रवीच्या बोटांमध्ये आढळून येतात. हे सांधे ज्या बोटांमध्ये असतात किंवा ज्या ग्रहाच्या बोटामध्ये आहेत त्या ग्रहाच्या गुणधर्मानुसार व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रभावित होते. जसे की शनी ग्रहाच्या बोटामध्ये सांधा असेल तर व्यक्ती अति विचार पूर्वक निर्णय घेईल त्याचे शांततेने विश्लेषण करत बसेल व जलद निर्णय घेणार नाही, थंड प्रवृत्ती असते.
सोबतच्या आकृतीमध्ये पाचही बोटांच्या पेर्यामधील गुण दाखविले आहेत. हे पेर्यावरील गुण हे बोटांवरील पेर्यात कमी जास्त अंतर असेल तर बदलते . पेरे नखाच्या बाजूने एक दोन तीन असे मोजतात. पेरे लांबीला सम प्रमाणात असतील तर उत्तम समजले जातात. परंतु अशी स्थिती सहसा पाहावयास मिळत नाही. पहिले पेर थोडे छोटे, दुसरे मोठे व तिसरे बर्यापैकी छोटे पाहावयास मिळते. छोट्या आकाराची पेरे शुभ गुणांची नसतात. त्यांच्या उपजत गुणात न्यूनता येते तसेच पेर्यावरील उभ्या रेषा शुभ, आडव्या रेषा अडथळा दाखवितात. शुभ अशुभ चिन्हे बोटांच्या पेर्यावर असतील तर त्यांचाही प्रभाव व्यक्तीच्या गुणात होतो.
बोटांच्या पेर्यांच्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे मनुष्याच्या ठायी असलेल्या विविध गुणांची जंत्री पेर्यांवर दिली आहे. प्रत्येक बोटांच्या पेर्यात असलेले गुणधर्म बोटांच्या खाली असलेल्या ग्रहांचे गुणधर्म आहेत त्या मध्ये पहिले बोट गुरुचे, दुसरे, शनीचे, तिसरे, रवीचे व चौथे बुधाचे, बुधाच्या ग्रहाच्या खाली वरचा मंगळ व मस्तक रेषे खाली चंद्र ग्रह अश्या तीन ग्रहांचे गुणधर्म सम्मिलीत आहेत. त्याचप्रमाणे अंगठा व अंगठ्याच्या आतील भागातील वरचा मंगळ व शुक्र ग्रहाचे गुणधर्म लाभले आहेत.
बालकाच्या जन्माच्या वेळेस गुरु ग्रहाच्या बोटातून शक्ति प्रवेश करते व बालक जन्माला येते. बालक जन्माला येण्या पूर्वी पहिला श्वास घेताना अनामिक शक्ती गुरु ग्रहाच्या म्हणजेच पहिल्या बोटातून प्रवेश करते. बालकाच्या जन्माच्या वेळेस त्याची बोटे ताठ होतात व पहिल्या बोटातून पुढे आयुष्य रेषेतून अनामिक शक्ती प्रवाहीत होते व पहिला श्वास आत घेतला कि फुफुसांचा भाता चालू होतो. बालक जन्माला येताना आईच्या नाळे पासून वेगळे होते व या सृष्टीत प्रवेश करते.
मानव जो श्वास घेतो व सोडते त्या प्रत्येक प्रक्रियेत बोटांकडून आलेल्या संवेदना तो ग्रहण करतो. मानवाच्या संवेदना बोटांकडून प्रवाहित होतांना आयुष्य रेषा व हातावरच्या सर्व प्रमुख व गौण रेषेतून त्या संवेदनांचा प्रवास प्रत्येक श्वासा गणित होत असतो. मानवाच्या हातावरील सर्व रेषांमधून विद्युत प्रवाह निरंतर कार्यरत असतो. हातावरील रेषांमध्ये असलेले शुभ अशुभ घटना तो विद्युत प्रवाह अंकित करत असतो व त्या वय वर्षात त्या व्यक्तीच्या आयुष्यात शुभ घटना घडून येताना बरोबर त्या त्या रेषेंवर त्या त्या वय वर्षात मनुष्याचे भाग्य व नियती मोजत असतो व घटका भरली कि शुभ अशुभ घटना घडतात.
मनुष्याचे भाग्य व नियती
हस्त सामुद्रिक शास्त्र हे व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा सुख दुःखांचा लेखाजोखा व त्याचा बारीक सारीक घटनांची नोंद ठेवतो. आयुष्याचा संपूर्ण आलेख डाव्या व उजव्या हातावर असतो. तो फक्त वाचता आला कि व्यक्ती त्याचे आयुष्य कसे व्यतीत करेल, त्याला कुठल्या वयात संकटे व गंडांतराचा सामना करावा लागेल, सुखाचा कालावधी किती इत्यादी अनेक व्यक्तिगत संपूर्ण जीवनाचा कालनिर्णय करता येतो. यात महत्वाची भूमिका आयुष्य रेषा वा जीवन रेषा म्हणतात. त्या रेषेच्या साहाय्याने बारीक सारीक गोष्टींच्या घटना जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या काढता येतात. आयुष्य रेषा उगम स्थानी शून्य वर्षाची धरली जाते. जसे वय वाढते त्यानुसार आयुष्य रेषेचा प्रवास मनगटाकडे मोजला जातो. जसे कि कन्याकुमारी स्टेशन वरून गाडी सुटली कि ती प्रवासात येणार्या विविध स्टेशन पार करीत असताना मुक्कामी जम्मूला जाताना तिचा सर्व प्रवास व वेळ मोजला जातो त्या प्रमाणे आयुष्य रेषा जन्मापासून मृत्यू पर्यंतचा कालखंड दाखविते.
हस्त सामुद्रिक शास्त्र फक्त रेखा शास्त्र नव्हे!
हस्त सामुद्रिक शास्त्र फक्त रेखा शास्त्र नव्हे. रेषा सुख दुःखाचा कालनिर्णय दाखवितात. ज्या ग्रहावर आहे त्या ग्रहाचे कारकत्व त्या रेषेला लाभते. परंतु ग्रह व हाताचा आकार या मध्ये बोटे महत्वाची भूमिका निभावतात. विविध प्रकारचे असंख्य कला कौश्यल्याचे हात व बोटे व संपूर्ण हातांची निर्मिती ब्रह्माकडून होत असते. प्रत्येक व्यक्तीत विशिष्ठ प्रकारचे गुण किंवा कौशल्य असते. ती व्यक्ती उपजत गुण घेऊन जन्माला येते. उपजत गुण -जसे संशोधक ते विविध कलेत नैपुण्य, अनेक विषयातील कल्पना विस्तार व नव निर्मिती, गायन, वादन ते अभिनय, नृत्य, नेतृत्व गुण, क्रीडा, व्यापार, शेयर मार्केट, विश्लेषण व चिकित्सा, अध्यात्म, साहित्य, कवी, लेखक अशा हजारो प्रकारचे नैपुण्य देणगी होय. या उपजत देणगीमध्ये त्या त्या गुणांच्या शुभ ग्रहांचा प्रभाव व्यक्तीत आढळतो. सर्वात महत्वाचे म्हणजे हातावरची बोटे व त्यावरील प्रत्यक्ष पेर्यांचे विविध विषयातील नैपुण्या व्यक्तीत पहावयास मिळते. आकृतीत दाखविल्या प्रमाणे प्रत्येक पेर्यांचे विविध गुण प्रदान होताना बोटाखालील असलेल्या ग्रहांचा शुभ अशुभ परिणाम घेऊन पेर्यां मधील विविध गुणाचे मापन होते.
8888747274
ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड