Wednesday, February 4, 2026
Homeदेश विदेशदिल्लीतील हुमायूंच्या मकबऱ्यातील भिंत कोसळली; ७-८ जण दबले, मदतकार्य सुरु

दिल्लीतील हुमायूंच्या मकबऱ्यातील भिंत कोसळली; ७-८ जण दबले, मदतकार्य सुरु

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या पावसामुळे काही दुर्दैवी घटना घडल्या असून, त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले. या घटनेनंतर ढिगाऱ्याखालून अनेक लोकांना बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची सूचना अधिकाऱ्यांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) तसेच इतर आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या.

- Advertisement -

भिंत कोसळल्याची माहिती मिळताच ५ फायर टेंडर घटनास्थळी पाठवण्यात आले. शोध आणि मदतकार्य लगेच सुरु करण्यात आले. दरम्यान तातडीने मदतकार्य सुरु केल्याने भिंती खाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु झाले.

YouTube video player

या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. सध्या तरी ढिगाऱ्याखाली कोणीही अडकले नसल्याचे मानले जात आहे. परंतु घटनास्थळाची सखोल पाहणी सुरू आहे. बचाव पथके अद्यापही तेथे उपस्थित असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहेत. मात्र एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आठ ते नऊ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हुमायूं मकबऱ्यामध्ये असलेल्या एका खोलीची भिंत कोसळली. हा मकबरा प्राचीन असून, १६व्या शतकाच्या मध्यात बांधला गेलेला आहे. हा मकबरा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. मात्र, सध्या पाऊस असल्याने गर्दी कमी आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...