तळोदा | श.प्र. TALODA
तळोदा शहरातील कॉंग्रेस पक्षाचे (Congress party) माजी नगराध्यक्ष भरत माळी (Former Mayor Bharat Mali,), माजी नगरसेवक संजय माळी, लक्ष्मण माळी, स्वीकृत नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी यांच्यासह कॉंग्रेसचे शेकडो पदाधिकारी व व कार्यकर्त्यांनी आ.राजेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे भाजपा प्रदेश (BJP State Offices) कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (Bharatiya Janata Party) प्रवेश (joined) केला.
कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला तळोदा शहर आज शत प्रतिशत भाजपाच्या वाटेवर असून भाजपामय मतदारसंघ करण्यात आ.राजेश पाडवी यांना यश आले आहे. या सर्व प्रवासात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेदेखील योगदान आहे. यावेळी प्रदेश कार्यालय, मुंबई येथे महामंत्री माधवी नाईक, प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, नंदुरबार जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, तळोदा येथील नगरसेवक योगेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.