Saturday, April 26, 2025
Homeनाशिकमंदिराच्या कळसावर कोसळली वीज

मंदिराच्या कळसावर कोसळली वीज

शेकडो पक्ष्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

सिन्नर । वार्ताहर Sinnar

- Advertisement -

तालुक्यातील वावी-शहा रस्त्यावर असलेल्या महादेव मंदिराच्या कळसावर वीज कोसळून कळसाला तडे गेल्याने मंदिराचे मोठे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी (दि.24) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मंदिरावर वीज कोसळल्याने मंदिरात आश्रयास असलेल्या शेकडो पारव पक्ष्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

वावी-शहा रस्त्यावर 111 फूट उंचीचे महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात रूद्राक्षांच्या हजारो झाडांचे संगोपन करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिराच्या परिसरात सतत विविध पक्ष्यांचा वावर असतो. गगनचुंबी कळसाच्या आश्रयाला शेकडो पारव पक्ष्यांची घरटी आहेत. दिवसभर भ्रमंती करणारे हे पक्षी रात्रीच्या वेळी मंदिरात आपल्या घरट्यांमध्ये आश्रयाला येतात. मंगळवारी रात्री परिसरात विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली.

रात्रभर पाऊस सुरूच होता. सकाळी दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांना मृत पक्ष्यांचा खच पडलेला बघायला मिळाला. त्यामुळे मंदिराच्या कळसाकडे सर्वांचे लक्ष गेले असता वीज पडून कळसाच्या काही भागाची पडझड झाल्याचे आढळून आले. कळसाला ठिकठिकाणी तडेदेखील गेल्याचे नागरिकांना दिसून आले. विजेच्या धक्क्याने शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने नागरिकांसह पक्षीप्रेमींकडून हळहळ व्यक्त होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...