Monday, June 24, 2024
Homeनगरकायगाव-टोका येथील उपोषणार्थीची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी रुग्णालयात हलविले

कायगाव-टोका येथील उपोषणार्थीची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी रुग्णालयात हलविले

देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata

- Advertisement -

जुने कायगाव- टोका येथे रविवार 3 सप्टेंबर पासून आमरण उपोषणास बसलेले सकल मराठा क्रांतीमोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पाठे यांची उपोषणाच्या आठव्या दिवशी रविवार दि. 10 रोजी तब्येत कमालीची ढासळली. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.

उपोषणास बसलेले देविदास पाठे यांना रक्ताची उलटी झाली, रक्तदाब वाढला होता. शुगर कमी झाली होती. अशक्तपणामुळे त्यांनी डोळे पांढरे केले होते. त्यामुळे त्यांना तत्काळ छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पखोरा (ता. गंगापूर) येथील देविदास पाठे पाटील (वय 38) यांनी रविवारी 3 सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले होते.उपोषणाचा आठवा दिवस होता.

मात्र रविवारी दुपारनंतर आमरण उपोषणाने त्यांची प्रकृती चांगलीच खालावली होती. त्यामुळे उपस्थित प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्ते यांनी कुठलाही विलंब न करता त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव उपस्थित होते. पोलीस बारकाईने परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे उपस्थित जमावकडून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या