Monday, June 24, 2024
HomeनाशिकVideo : नैताळेत आमरण उपोषणास सुरुवात; छत्रपती संभाजीराजेंनी दिली उपोषणस्थळी भेट

Video : नैताळेत आमरण उपोषणास सुरुवात; छत्रपती संभाजीराजेंनी दिली उपोषणस्थळी भेट

नैताळे | वार्ताहर | Naitale

- Advertisement -

जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंतरवाली सराटी येथील मनोज जारंगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण (Hunger Strike) सुरू केले आहे. त्यांना समर्थन म्हणून नैताळे येथील मराठा शेतकरी वाल्मिक गंगाराम बोरगुडे यांनी आज सकाळी आठ वाजेपासून नैताळेत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे…

Nashik News : यंदा पोळ्याच्या सणावर महागाईचे सावट; सजावटीच्या वस्तूंच्या दरात ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

तसेच उपोषणस्थळी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, तुमच्या भावना शासनापर्यंत पाठवून समस्त मराठा बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत आहे. आमरण उपोषण करतांना तुम्ही मात्र तब्येतीची काळजी घ्या, असे आव्हान संभाजीराजे यांनी केले. यावेळी नैताळे परिसरातील असंख्य तरुण (Youth) उपोषणस्थळी जमा झाले होते.

Nashik News : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नैताळेत सरणावर उपोषणाची तयारी

दरम्यान, यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्यास पुष्पहार घालून उपोषणास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी गावातील भजनी मंडळी टाळ मृदुंगाच्या गजरात उपोषणस्थळी भजन म्हणत दाखल झाले. तसेच गावातील असंख्य तरुण उपोषणास बसले आहे. तर निफाड पोलीस ठाण्याचे (Niphad Police Station) पोलीस निरीक्षक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या