Sunday, April 27, 2025
Homeक्राईमपहाटे घरात घुसले, पती-पत्नीला मारहाण करून लुटले

पहाटे घरात घुसले, पती-पत्नीला मारहाण करून लुटले

नगर तालुक्यातील घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तीन ते चार जणांच्या टोळीने (Gang) घरात घुसून पती-पत्नीला मारहाण (Husband and Wife Beating) करत त्यांच्याकडील रोकड व सोन्याचे दागिने असा 93 हजाराचा ऐवज लुटून नेला. नगर तालुक्यातील सारोळा कासार (Sarola Kasar) शिवारात बुधवारी (19 जून) पहाटे एकच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar taluka Police Station) जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुगंधा कुंडलिक कडुस (वय 60) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे पती सरोळा कासार गावच्या शिवारात राहतात व शेती करतात. मंगळवारी (18 जून) रात्री ते दोघे घरात झोपलेले असताना बुधवारी पहाटे एकच्या सुमारास त्यांना दरवाजा वाजल्याचा आवाज आला.

- Advertisement -

त्यांनी दरवाजा उघडला असता तीन ते चार चोरटे घरात घुसले. त्यांच्या हातातील काठीने त्यांनी फिर्यादी व त्यांच्या पतीला मारहाण केली. घरातील 50 हजाराची रोकड, पाऊण तोळ्याचे सोन्याचे गंठण (Gold Jewelry), अडीच ग्रॅमचे सोन्याचे कानातील फुले, एक ग्रॅमचे सोन्याचे कानातील कुडके असा 93 हजार रूपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला. सर्व चोरटे 30 ते 35 वयोगटाचे असून ते हिंदी व मराठी भाषेत बोलत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घाबरलेल्या फिर्यादी व त्यांच्या पतीने नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून अधिक तपास सुरू केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...