Wednesday, January 7, 2026
HomeनगरRahata News : शेततळ्यात बुडत असलेल्या पत्नीस वाचविताना पतीसह तरुणाचा बुडून मृत्यू

Rahata News : शेततळ्यात बुडत असलेल्या पत्नीस वाचविताना पतीसह तरुणाचा बुडून मृत्यू

राहाता (तालुका प्रतिनिधी)

शेततळ्यावर विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेलेल्या पत्नीचा शेततळ्यात पाय घसरल्याने पाण्यात तीला वाचविण्यासाठी पतीने उडी घेतली. हे दोघे बूडत असल्याचे बघुन एका तरुणाने त्यांना वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी घेतली. या घटनेत महिला वाचविण्यात यश आले मात्र पती व तो तरुण शेततळून बूडून मृत पावले. ही दुदैवी घटना अस्तगावच्या चोळकेवाडी येथे घडली. याप्रकारणाने चोळकेवाडी, अस्तगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

आज रविवारी सकाळी 7 वाजता रामदास सखाहारी चोळके व त्यांच्या पत्नी सुमनाबाई चोळके हे दोघे त्यांच्या मालकीच्या शेततळ्यावर विद्युत मोटार सुरु करण्यासाठी जात असताने पुढे काही अंतरावर चालत असलेल्या सुमनबाई यांचा पाया शेततळ्याच्या प्लॅस्टिक कागदावरुन घसरला. त्या पाण्यात पडल्या बुडू लागल्या. हे दृष्य पाहुन पती रामदास सखाहरी चोळके यांनी काही क्षणाचाही विलंब न करता मोठ्याने ओरडत शेततळ्यात उडी घेतली. रामदास यांचा हा आवाज वस्तीवरील त्यांच्या सुनबाईंनी ऐकला. त्यांनीही जोरत ओरडत प्रसंगाची कल्पना आजुबाजुच्या रहिवाश्यांना दिली.

YouTube video player

वस्तीवरील तरुण आदेश आण्णासाहेब नळे यांनी ऐकून शेततळ्याच्या दिशेने धाव घेत शेततळ्यातील पती पत्नी बुडत असल्याचे पाहाताच क्षणाचाही विलंब न करता त्याने शेततळ्यात उडी मारली. आदेशने सुमनबाईंना ढकलत शेततळ्याच्या कडेला आणले. एव्हाना आजुबाजुचे रहिवाशी दोर घेवून तळ्यावर दाखल झाले होते. सुमनबाईंनी दोर पकडला. परंतु रामदास चोळके आणि आदेश नळे हे पोहता पोहता थकल्याने ते बुडू लागले. इतरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले, परंतु त्यांना यश मिळाले नाही.

या दुर्घटनेत रामदास सखाहरी चोळके (वय 56) व आदेश आण्णासाहेब नळे (वय 22) या दोघांचा दुर्दर्वी मृत्यु झाला. या घटनेत वाचलेल्या सुमनबाईंना तात्काळ प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे दाखल करण्यात आले. या दुर्घटनेतील रामदास हे वारकरी सांप्रदायत होते, तर आदेश हा तरुणाचा अद्याप विवाहही नव्हता. अस्तगाव तसेच चोळकेवाडी परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...