Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारगळा चिरुन पत्नीला जिवे ठार मारणार्‍या पतीला अटक

गळा चिरुन पत्नीला जिवे ठार मारणार्‍या पतीला अटक

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

चाकुने गळा चिरुन (Wife) पत्नीला जिवे ठार (Murder) मारणार्‍या पतीला (police) पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान, मोबाईल हातात घेण्यावरून झालेला वाद विकोपाला गेल्याने पतीने पत्नीचा खून (Murder) केल्याची कबुली पतीने दिली.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूण सुकलाल नामदास (वय ३६) व त्याची पत्नी सौ.रेखा अरूण नामदास (वय-२८) हे दाम्पत्य नंदुरबार शहरातील तुलसीविहार कॉलनीत राहतात. दि. २१ ते २२ जून दरम्यान त्यांच्यात कौटूंबिक कारणावरून वाद झाल्यानतर रागाच्या भरात अरूण हा त्याची पत्नी सौ.रेखा हिचा चाकूने गळा चिरुन तेथून पळून गेला.

सौ.रेखा अरूण नामदास यांना शेजारच्या व्यक्तींनी रुग्णलयात दाखल करण्यापुर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. म्हणून अरूण सुकलाल नामदास याच्याविरुध्द् उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक, पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील व अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

(lcb) स्थानिक गुन्हा अन्वेशण शाखेचे पथक तयार करुन तात्काळ आरोपीला ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. संशयीत अरूण सुकलाल नामदास हा सिंधी कॉलनी येथील तमन्ना सुपर शॉपी नावाच्या दुकानात काम करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.

त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना पथकासह तमन्ना सुपर शॉपी येथे रवाना केले. दुकान मालक व दुकानात काम करणारे इतर कामगारांकडून गुन्ह्यातील संशयीत आरोपीताचा फोटो व मोबाईल क्रमांक प्राप्त केला.

तसेच थोड्या वेळापुर्वी अरुण नामदास हा दुकानावर आला होता व दुकान मालकाकडून ५०० रुपये घेवून गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली. अधीक्षक पी.आर.पाटील यांना एका गोपनीय बातमीदारामार्फत खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी हा त्याचे मुळ गाव अमळनेर जि.जळगांव येथे धुळे मार्गे एका बसने जात असल्याची माहिती मिळाली.

त्यामुळे पथकाने नंदुरबार बसस्थानक येथे जावून धुळ्याला जाणार्‍या बस व खाजगी वाहनांची माहिती घेतली असता थोड्याच वेळापूर्वी धुळ्याला एक बस गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पथकाला तातडीने धुळ्याकडे रवाना करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धुळे येथील बस स्थानक येथे पोहोचल्यावर नंदुरबार येथून एक बस काही वेळापूर्वीच आल्याची माहिती मिळाली. संशयीत आरोपी हा बस स्थानकाच्या बाजुला असलेल्या टॅक्सी स्टँडजवळ अमळनेर येथे जाणार्‍या गाडीजवळ उभा असल्याचे दिसून आले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्यास ओळखून टॅक्सी स्टँडच्या आजुबाजुला सापळा रचला. पोलीसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करणार्‍या अरुण नामदास याला पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेतले.

त्याला नंदुरबारला आणण्यात आले. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी संशयीतास विचारपुस करुन संशयीताच्या त्याच्या विसंगत बाबी निदर्शनास आणून दिल्या व संशयीत आरोपी अरूण सुकलाल नामदास यास बोलते केले व त्याने खून केल्याचे कबुल केले तसेच घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली.

दि.२१ जून २०२२ रोजी रात्री मयत रेखा हिचा मोबाईल हातात घेण्यावरून कौटुंबीक वाद झाला होता व रागाच्या भरात अरुण नामदास याने त्याची पत्नी मयत रेखाबाई नामदास हिचा धारदार चाकुने गळा चिरून जिवे ठार केले, अशी माहिती त्याने दिली. अरूण नामदास यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कामगिरी (Superintendent of Police PR Patil) पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, विजय पवार, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, पोलीस अमंलदार आनंदा मराठे, मंगलेश वसईकर यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या