Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमपतीचा पत्नीवर चाकूने हल्ला

पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दोन दिवस कोठे होता अशी विचारणा केली असता पतीने पत्नीला लाकडी बॅटने मारहाण करून चाकूने हल्ला करत जखमी केले. राणी विजय विधाते (वय 24 रा. श्रीकृष्णनगर, कल्याण रस्ता) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती विजय अरुण विधाते (रा. श्रीकृष्णनगर, कल्याण रस्ता) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

रविवारी (13 ऑक्टोबर) रात्री नऊ तसेच सोमवारी (14 ऑक्टोबर) सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादीचे पती दारू पिऊन घरी आले. त्यावेळी फिर्यादीने त्यांना ‘दोन दिवस आपण कोठे होता’ अशी विचारणा केली असता त्यांना त्याचा राग आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून दमदाटी केली. लाकडी बॅटने मारहाण केली. स्वयंपाक घरातील चाकूने हल्ला करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. जखमी फिर्यादीने येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार सोनवणे करत आहेत.

ताज्या बातम्या

रामाला

शिवशंकर गरिबांचे, तर रामाला श्रीमंताचा देव; तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींच्या विधानाने...

0
नवी दिल्ली | New Delhiतेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी भगवान श्रीराम आणि महादेव यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. “शिव हे...