Wednesday, April 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजवृद्ध पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या

वृद्ध पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

येथील जेल रोड परिसरातील वीर सावरकर नगर मध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षक पत्नीच्या आजारपणाला कंटाळून सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने तिचा गळा दाबून खून केल्याचा खळबळ जनक प्रकार घडल्यानंतर. नंतर स्वतः पतीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जेलरोड येथे घडली या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. उपनगर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरलीधर रामचंद्र जोशी (७८) हे पत्नी लता जोशी (७६) यांच्यासह जेल रोडच्या वीर सावरकर नगरमधील एकदंत सोसायाटीत राहात होते. दोघे उंबरखेड (जि. जळगाव) येथे मुख्याध्यापक होते. २०१७ साली निवृत्तीनंतर दोघे जेलरोड येथे राहण्यास आले होते. त्यांची दोन्ही मुले मुंबईत उच्च पदावर नोकरीला आहेत. या दामप्त्याची काळजी घेण्यासाठी महिला कामाला होती. लता जोशी या सतत आजारी असायच्या. ब्रेन हॅमरेजमुळे त्या रुग्णालयात दीड महिने कोमात होत्या. रुग्णालयातून घरी आल्यानंतरही त्या आजारीच होत्या.

बुधवारी (दि.९) सायंकाळी सातच्या सुमारास मुरलीधर जोशी यांनी पत्नीच्या आजारपणाला कंटाळून त्यांचा गळादाबून खून केला. नंतर स्वतः आत्महत्या केली. आपण स्वेच्छेने हे कृत्य करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

घरकाम करणा-या महिलेच्या लक्षात खूनाची घटना लक्षात आली. या संदर्भात उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना माहिती समजतात ते व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर. पंचनामा करण्याचे काम पोलीस कर्मचारी करीत होते तसेच याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : मनपा आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांची बदली...

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik नाशिक मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.तानाजी चव्हाण तसेच डॉ. शेटे यांच्या चौकशीचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहे. डॉ. चव्हाण यांची बदली...