Friday, October 18, 2024
Homeक्राईमदुचाकीचा अपघात ; पती ठार, पत्नी गंभीर

दुचाकीचा अपघात ; पती ठार, पत्नी गंभीर

यावल – प्रतिनिधी
यावल-भुसावळ रस्त्यावर यावल शहराच्या बाहेरील पेट्रोल पंपाजवळ भुसावळ कडून यावलकडे येत असतांना दुचाकीच्या (बॉक्सर गाडी) टायर फुटले आणि यात पती जागीच ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

हा अपघात शुक्रवारी सायंकाळी चार वाजता घडला असून घटनेची माहिती मिळताच आ. शिरिष चौधरी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी व कार्यकर्त्यांनी जखमींना मदत केली व मयताचा मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. मयत हे शिरसाड येथील असून अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती.

- Advertisement -

शुक्रवारी सायंकाळी चार वाजता भुसावळ कडून यावलकडे दुचाकी क्रमांक एम. एच.१९ एन. २४३३ द्वारे जगदीश वासुदेव अत्तरदे वय ५३ व त्यांची पत्नी हेमलता जगदीश अत्तरदे वय ४५ हे पती-पत्नी येत होते. दरम्यान पेट्रोल पंपाच्या जवळ त्यांच्या दुचाकीचे पुढील टायर फुटले आणि भरधाव वेगातील दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. हा अपघात प्रचंड भीषण होता.

या अपघातात अत्तरदे यांचे डोके झाडावर आदळले गेल्याने जबर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी ही गंभीर जखमी झाली. ट्राफिकचे पोलीस हवलदार अर्शद गवळी, सहायक फौजदार असलम खान यांनी जखमी महिलेला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. तर मृतदेह विकास पाटील यांच्या वाहनातून यावल रुग्णालयात आणण्यात आला. अपघाताची माहिती साकळी व शिरसाड गावातील नागरिकांनी धाव घेतली साखळी सरपंच दीपक पाटील, शिरसाड येथील ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, माजी सदस्य गोटू साळुंके सह साकळी व शिरसाड गावातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. अपघातात गंभीर जखमी असलेल्या महिलेला पुढील उपचारासाठी जळगाव हलवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या