Friday, May 2, 2025
Homeधुळेचिंचखेडा येथे गळा आवळून पतीचा खून

चिंचखेडा येथे गळा आवळून पतीचा खून

धुळे । dhule। प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील चिंचखेडा गावात पत्नीने (wife) तिघांच्या मदतीने गळा आवळून (Throat) व हाताबुक्यांनी मारहाण करीत पतीचा (husband’s) खून (murder)केला. काल सकाळी ही खळबळजनक घटना घडली. नेहमीच वाद घालत असल्याने पत्नीने पतीचा काढा काढला. पोलिसांनी आरोपी पत्नीसह चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अजय भाल्या उर्फ भालचंद्र बर्डे (वय 39 रा. काकसेवड पैकी चिंचपाडा ता.साक्री) असे मयताचे नाव आहे. मयत अजय हा पत्नी सौ.सुंदराबाई बर्डे हिच्याशी नेहमीच काहीना काही कारणावरून वाद करीत असायचा.

या कारणावरून काल दि.20 रोजी सकाळी 7 वाजता त्याच्या घराच्या ओट्यावरच शांताराम हाट्य माळचे व दानीयल शांताराम माळचे (रा. मांजरी ता. साक्री) या दोघांनी अजला धरून हाताबुक्यांनी पोटावर व पाठीवर मारहाण करीत गळा दाबून धरला.

तर सौ.शानुबाई शांताराम माळचे (रा. मांजरी) व सुंदराबाई बर्डे (रा. काकसेवड) यांनी हाताबुक्यांनी पोटावर मारहाण करीत अजय बर्डे याचा खून केला. याबाबत लक्ष्णम कुची बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांवर भादंवि कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पीएसआय प्रदीप सोनवणे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अवकाळी

Rain Update: दिल्लीत अवकाळी पावसाचा हाहाकार; वादळीवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याची...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये वादळ, पाऊस आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. दिल्ली-यूपीमध्ये प्रत्येकी ४ आणि...