पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने डोक्यात दगड घालून 60 वर्षीय पत्नीची हत्या केली. पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील तुकाईमाता मंदिर टेकडीजवळ ही घटना घडली. शनिवारी (दि.5) दुपारी दोन वाजता ही घटना उघडकीस आली. सावित्रा बबन देशमुख (वय 62) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर मृत महिलेची मुलगी प्रियंका अशोक बिलबिले (वय 35, रा. पळशी, ता. पारनेर) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बबन पाराजी देशमुख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बबन आणि त्याची पत्नी सावित्रा हे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथून मोलमजुरीसाठी वनकुटे येथे आले होते. बबन याला दारूचे व्यसन आहे. सावित्रा त्याला दारू पिण्यास विरोध करत होती. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी दोघांनीही एकमेकांना दगडाने मारहाण केली. यात सावित्रा हिचा मृत्यू झाला.