Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime News : विवाहबाह्य प्रेमसंबंधात पती अडसर; पतीची हत्या

Nashik Crime News : विवाहबाह्य प्रेमसंबंधात पती अडसर; पतीची हत्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

विवाहबाह्य प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्याने पत्नीने पतीचा मावसभाऊ असलेल्या प्रियकराकरवी पतीचा खून केल्याचे उघड झाले आहे. इंदिरानगर पाेलिसांच्या हद्दीतील कचरा डेपाेजवळील निर्जन ठिकाणी नांदगाव येथील याेगेश बत्तासे(वय ३२) या विवाहित तरुणाच्या डाेक्यात दगड टाकून निर्घृण खून केल्याचा प्रकार (दि. ९) उघड झाला हाेता. मृताची ओळख पटल्याने या खुनाचा उलगडा करण्यात काही तासांत यश आले आहे.

कोमल योगेश बत्ताशे (रा. पिंपरखेड, ता. नांदगाव) कृष्णा जयराम गाेराणे (रा. सिडकाे) अशी अटक केलेल्या संशयित प्रेमीयुगुलाचे नाव आहे. योगेश बत्ताशे याची पत्नी कोमल व याेगेशचा मावसभाऊ कृष्णा यांचे काही महिन्यांपासून चाेरीछुपे प्रेमसंबंध हाेते. दाेघेही सिडकोत एकाच घरात भाडेतत्वावार राहत होते. ही बाब योगेशला समजली. त्यातून त्यांच्यात वादही झाला होता.

योगेश बत्तासे याने पत्नी आणि मावसभावाला समज दिली होती. याेगेशने समज दिल्याचा राग आल्याने दोघांनीही संगनमत करुन योगेशचा काटा काढण्याचे ठरविले. त्यासाठी कृष्णा गोराणे याने शुक्रवारी (दि.८) रात्री आठ वाजेच्या सुमारास खत प्रकल्पासमोरील बाजूस योगेश बत्ताशे यास बोलवून घेतले. दाेघांनी मद्यपान केले. त्यानंतर कृष्णाने योगेशच्या डोक्यात दगड घालून खून केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...