Tuesday, December 3, 2024
Homeक्राईमपतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने केले अतिप्रमाणात औषधाचे सेवन

पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने केले अतिप्रमाणात औषधाचे सेवन

पतीविरोधात भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने अतिप्रमाणात औषधाचे सेवन (वेगवेगळ्या प्रकारच्या 10 ते 12 औषधी गोळ्या) केल्याची घटना भिंगारमध्ये घडली. कोमल राहुल कुदळे (वय 29 रा. विजय लाईन चौक, भिंगार) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

राहुल वसंत कुदळे (रा. विजय लाईन चौक, भिंगार) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. सदरची घटना 10 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली असून गुन्हा 13 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. राहुल व त्याची पत्नी कोमल भिंगार शहरातील विजय लाईन चौक परिसरात एकत्र राहत असताना राहुल तिला दारू पिऊन शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करत होता. त्यांच्याकडे सोन्याच्या दागिन्याची मागणी केली होती.

त्याच्या या त्रासाला कंटाळून कोमल यांनी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अतिप्रमाणात औषधाचे सेवन (वेगवेगळ्या प्रकारच्या 10 ते 12 औषधी गोळ्या) केले. यामुळे कोमल यांना त्रास होवू लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्यांनी पोलिसांना जबाब दिला असून पोलिसांनी जबाबावरून राहुल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार व्ही. आर. राठोड करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या