Friday, May 3, 2024
Homeनगरपतीनेच केली पत्नीची फसवणूक

पतीनेच केली पत्नीची फसवणूक

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पतीने भेटण्यास आलेल्या पत्नीची फसवणूक करून तिच्या बँक खात्यातील एटीएमद्वारे 80 हजार रुपये रोख व एक मोबाईल फोन लंपास केल्याची घटना पाथर्डी मध्ये घडली.

- Advertisement -

संदिप सखाराम सानप (रा. हिवरशिंगा ता. शिरुर कासार जिल्हा- बीड) असे संशयित पतीचे नाव आहे. त्याच्या विरोधात रेश्मा पंडित उर्फ संदीप सानप (रा. खराबवाडी चाकण ता. खेड पुणे) या त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून गुप्तपणे फसवणूक केल्याच्या कारणावरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी रेश्मा सानप ही पुणे येथुन पाथर्डी येथे पती पंडीत उर्फ संदिप सानप यास शनिवारी (दि.9) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भेटण्यासाठी आली होती. दोघांनी पाथर्डी शहरातील एक लॉजवर आराम केला. दरम्यान पत्नी रेश्मा झोपी गेल्यानंतर पती पंडीत उर्फ संदिप सानप हा त्यांच्या जवळील मोबाईल फोन व बँकेचे ए.टी.एम कार्ड घेऊन गेला असल्याचे निदर्शनास आले. त्या एटीमधून पैसे काढण्यास गेल्या असता आकऊंटवरील सर्व 80 हजार रूपये काढल्याचे समजले. अखेर रेश्मा यांनी पोलीसांत धाव घेत पतीने फसवणुक केल्याची तक्रार दाखल केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या