Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या"मी एकाला विचारले EVM जिवंत आहे की…"; NDAच्या बैठकीत PM मोदींचा विरोधकांना...

“मी एकाला विचारले EVM जिवंत आहे की…”; NDAच्या बैठकीत PM मोदींचा विरोधकांना टोला

दिल्ली । Delhi

लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) निकालनंतर देशातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपप्रणित एनडीए आघाडीला २९२ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान एनडीएच्या संसदीय दलाची बैठक आज संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली. या बैठकीला काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. तसेच EVM मशिन्सवरुन सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांनाही चिमटा काढला.

- Advertisement -

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ४ जून रोजी निकाल लागला, मी माझ्या कामात व्यग्र होतो. पण मी एका माझ्या सहकाऱ्याला विचारलं की देशात ईव्हीएम जिंवत आहे का, की ईव्हीएम मरुन गेले आहे. भारताच्या लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास उडावा यासाठी विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आला. विरोधक ईव्हीएम मशिनवर टीका करायचे. मला तर वाटलं होतं, निकालानंतर ते ईव्हीएमची तिरडी काढतील. पण ४ जून रोजी संध्याकाळपर्यंत ईव्हीएमने विरोधकांना गप्प केले. हीच भारताच्या लोकशाहीची, निवडणूक आयोगाची ताकद आहे, असे म्हणत मोदींनी ईव्हीएमच्या मुद्दयावरुन विरोधकांना लक्ष्य केले.

तसेच, पुढच्या १० वर्षांनीही काँग्रेस १०० चा आकडा पार करू शकणार नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या त्या सर्व जागा आम्हाला या एका निवडणुकीत मिळाल्या आहेत. इंडिया आघाडी पूर्वी हळूहळू बुडत होते. पण आता आणि मी स्वच्छपणे पाहू शकतो की इंडिया वाल्यांना अंदाज नाहीय की हळूहळू ते बुडत होते, आणि तेजीने ते गर्तमध्ये जाणार आहेत, अशी टीका मोदी यांनी केली. इंडिया आघाडी देशातील सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकले नाहीत. भारताच्या सामान्य लोकांच्या व्यक्तीचीही काही मतं आहेत. जे नेते जमिनीशी जोडलेले असतात त्यांनाच सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकतात. पण ते तिथे कमी पडले. मी आशा करतो की ते लोकशाहीचा सन्मान करतील. पंरतु, त्यांच्या व्यवहारामुळे वाटतं की कदाचित त्यांच्यात ही क्षमता येण्याची वाट पाहावी लागेल, असंही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या