मुंबई | प्रतिनिधी Mumbai
उद्धव आणि राज हे ठाकरे दोघे बंधू जर एकत्र येणार असतील तर आम्हाला आनंदच आहे. कोणी जर आपापसातील मतभेद विसरून एकत्र येत असतील तर वाईट वाटण्याचे कारणच नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
- Advertisement -
एकाने साद दिली आणि दुसऱ्याने प्रतिसाद दिला. पण शर्तीही ठेवल्या आहेत, त्यावर मी काय बोलणार. याबद्दल त्यांनाच विचारले पाहिजे. पण यावर प्रसार माध्यमातच जास्त विचारमंथन सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले.
पण आगामी मुंबई महापालिका असोत वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर निवडणुका असोत. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच या सर्व निवडणुका जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.