दुबई | वृत्तसंस्था UAE
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा (ICC Champions Trophy – 2025 उपांत्य फेरीचा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई आंतराष्ट्रीय मैदानावर खेळण्यात आला. यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिलेल्या २६५ धावांचे आव्हान स्वीकारत भारतीय संघाने ४ गडी राखून ऑस्ट्रेलियाच्या संघावर विजय मिळवून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विराट कोहलीच्या ९८ चेंडूत ८४ धावा तर हार्दिक पंड्याने केलेल्या २४ चेंडूत ३० धावा करत भारतीय संघास विजय मिळवून दिला.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रथम फलंदाजी करण्याचा निणर्य घेतला. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून कूपर कॉनोली व ट्रॅव्हिस हेड प्रथम फलंदाजीस आले.सामन्याच्या तिसरया षटकात मोहमद शमीच्या गोलंदाजीवर के एल राहुलने कूपर कॉनोलीला झेलचीत करत शून्य धावसंख्येवर तंबूत परत पाठवून ऑस्ट्रेलियाच्या संघास पहिला धक्का दिला.
सामन्याच्या नवव्या षटकात वरून चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर शुभमनगिलने ट्रॅव्हिस हेडला झेलचीत केले. ट्रॅव्हिस हेडने ३३ चेंडूत २ षट्कार व ५ चौकार लगावत एकूण ३९ धावा केल्या. सामन्याच्या २३ व्या षटकात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर मार्नस लॅबशॅन पायचीत होत ऑस्ट्रेलियाच्या संघास तिसरा धक्का मिळाला. मार्नस लॅबशॅनने ३६ चेंडूत २९ धावा केल्या. २७ व्या षटकात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने जॉश इंग्लिसला झेल बाद केले. जॉश इंग्लिसने १२ चेंडूत ११ धावा केल्या.
३७ व्या षटकाच्या ४थ्या चेंडूवर मोहमद शमीने स्टीव स्मिथला क्लीन बोल्ड केले.स्टीव्ह स्मिथने ९६ चेंडूत १ षटकार व ४ चौकार लगावत ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून सर्वाधिक ७३ धावा केल्या. ३८ व्या षटकात अक्षर पटेलने ग्लेन मॅक्सवेलला केलीन बोल्ड करत ७ धावांवर माघारी पाठविले. ४६ व्या षटकात वरून चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने बेन ड्वॉरशुइसला झेल चीत केले. बेन ड्वॉरशुइसने २९ चेंडूत १९ धावा केल्या. ४८व्या षटकात श्रेयस अय्यर ने अलेक्स कॅॅरीला धावचीत केले.अलेक्स कॅॅरीने ५७ चेंडूत १ षटकार व ८ चौकार लगावत एकूण ६१ धावा केल्या. ४९ व्या षटकात मोहमद शमीच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने नेथन एलिसला झेलचित केले. नेथन एलिसने ७ चेंडूत १० धावा केल्या. ५० व्या षटकाच्या तिसरया चेंडूत अॅॅडम झम्पाला हार्दिक पंड्याने क्लीन बोल्ड केले. अॅॅडमने १२ चेंडूत ७ धावा केल्या. ५० व्या षटका अखेर ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्व गडी बाद २६४ धावा केल्या.
भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिल प्रथम फलंदाजीस आले. रोहित शर्मा व शुभमन गिलच्या जोडीने धुवाधार फलंदाजी करत खेळास सुरवात केली. सामन्याच्या पाचव्या शतकात बेन ड्वॉरशुइसने शुभमनगिलला क्लीन बोल्ड केले. शुभमन गिलने ११ चेंडूत ८ धावा केल्या. सामन्याच्या ८ व्या षटकातकूपर कॉनोलीच्या गोलंदाजीवर कर्णधार रोहित शर्मापायचीत झाला. रोहित शर्माने २९ चेंडूत १ षटकार व ३ चौकार लगावत एकूण २८ धावा केल्या. सामन्याच्या २७ व्या षटकात अॅॅडम झम्पाने श्रेयस अय्यरला क्लीन बोल्ड केले.श्रेयस अय्यरने ६२ चेंडूत ४५ धावा केल्या.
३५व्या षटकात नेथन एलिसने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड केले. अक्षर पटेलने ३० चेंडूत २७ धावा केल्या. सामन्याच्या ४३व्या षटकात अॅॅडम झम्पाच्या गोलं दाजीवर बेनने विराट कोहलीला झेल चीत केले. विराट कोहलीने ९८ चेंडूत ८४ धावा केल्या. शेवटच्या अटी तटीच्या लढाईत हार्दिक पंड्याला ग्लेन मैक्स्वेलने झेलचित केले. हार्दिक पंड्याने २४ चेंडूत तीन षटकार व एक चौकार लगावत एकूण २८ धावा केल्या. तर के एल राहुल ने शेवटचा षट्कार लगावत भारतीय संघास विजय मिळवून दिला.