Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजICC Champions Trophy : 2025 - IND Vs NZ : न्यूझीलंडला नमवून...

ICC Champions Trophy : 2025 – IND Vs NZ : न्यूझीलंडला नमवून भारतीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता

दुबई | वृत्तसंस्था

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा (ICC Champions Trophy – 2025 )अंतिम फेरीचा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई आंतराष्ट्रीय मैदानावर खेळण्यात आला. यात न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या २५२ धावांचे आव्हान स्वीकारत रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांच्या धडाकेबाज फलंदाजीने भारतीय संघाने ४ गडी राखून न्यूझीलंडच्या संघावर विजय मिळविला. भारतीय क्रिकेट संघ ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा’ विजेता ठरला आहे.

- Advertisement -

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार मिचेल सँटनरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघाकडून विल यंग आणि रचीन रवींद्र सलामीस फलंदाजीस आले. सामन्याच्या ८ व्या षटकातवरून चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर विल यंग पायचीत होऊन भारतीय संघाने न्यूझीलंडच्या संघाला पहिला दिला. विल यंगने २३ चेंडूत १५ धावा केल्या. सामन्याच्या ११ व्या शतकात कुलदीप यादवने फॉर्मात असलेल्या रचीन रवींद्रला क्लीन बोल्ड करत माघारी पाठविले. रचीन रवींद्रने २९ चेंडूत १ षटकार व ४ चौकार लगावत ३७ धावा केल्या.

१३ व्या शतकात कुलदीप यादवने गोलंदाजीवर केन विल्यमसनला झेल बाद करत न्यूझीलंडच्या संघास तिसरा धक्का दिला. केन विल्यमसनने १४ चेंडूत ११ धावा केल्या. २४व्या शतकात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर टॉम लॅथम पायचीत झाला.टॉम लॅथमने ३० चेंडूत १४ धावा केल्या.
३८ व्या षटकात वरून चक्रवर्तीने ग्लेन फिलिप्सला क्लीन बोल्ड करत न्यूझीलंडचा संघाचा पाचवा गडी बाद केला. ग्लेन फिलिप्सने ५२ चेंडूत ३४ धावा केल्या. ४६ व्या षटकात मोहमद शमीच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने डॅरिल मिशेलला झेलचीत केले. ४९ व्या षटकात विराट कोहलीने मिचेल सँटनरला झेल चीत करत न्यूझीलंडच्या संघाचा ७ वा गडी बाद केला. मिचेल सँटनरने १० चेंडूत ८ धावा केल्या. ५० व्या षटका अखेर न्यूझीलंडच्या संघाने ७ गडी बाद २५१ धावा केल्या.

भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिल प्रथम फलंदाजीस आले.रोहित शर्मा आणि शुभमनगिलच्या जोडीने धडाकेबाज फलंदाजीने सुरुवार केली. सामन्याच्या १९ व्या षटकात मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर ग्लेन फिलिप्सने शुभमनगिलला झेल बाद करत भारतीय संघास पहिला धक्का दिला. शुभमन गिलने ५० चेंडूत ३१ धावा केल्या. पाठोपाठ २० व्या षटकात मायकेल ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर विराट कोहली पायचीत झाला.विराट कोहलीने २ चेंडूत १ धाव केली. सामन्याच्या २७ व्या षटकात रचीन रवींद्रच्या गोलंदाजीवर टॉम लॅथमने शतक पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या कर्णधार रोहित शर्माला स्टंप आउट करत भारतीय संघाचा तिसरा खेळाडू बाद केला. रोहित शर्माने धडाकेबाज फलंदाजी करत ८३ चेंडूत ७३ धावा केल्या.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने धडाकेबाज फलंदाजी केली. मात्र अर्धशतक पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना सामन्याच्या ३९ व्या षटकात रचिन रविंद्रने श्रेयस अय्यरला झेल बाद करत भारतीय संघाचा चौथा खेळाडू बाद केला. श्रेयस अय्यरने ६२ चेंडूत ४८ धावा केल्या. ४२ व्या षटकात मिशेल ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर विल ओ’रोर्केने अक्षर पटेलला झेल बाद केले.अक्षर पटेलने ४० चेंडूत २९ धावा केल्या.

अखेरच्या अटी तटीचा सामना सुरु असतानाच काइल जेमीसनने हार्दिक पंड्याला झेलचीत केले.हार्दिक पंड्याने १८ चेंडूत १८ धावा केल्या. के एल राहुलने नाबाद ३४ धावा केल्या तर रवींद्र जडेजा ने ५ धावा केल्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...