Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजICC Men's T-20 World Cup : IND Vs NAM - भारताचा नामिबियावर...

ICC Men’s T-20 World Cup : IND Vs NAM – भारताचा नामिबियावर ९३ धावांनी विजय

दिल्ली | वृत्तसंस्था

दिल्ल्लीतील अरुण जेटली मैदानावर आज भारत विरुद्ध नामिबिया यांच्यात आय सी सी मेन्स टी-२० विश्वचषकाचा सामना खेळण्यात आला. भारतीय संघाकडून ईशान किशन व हार्दिक पांड्याच्या आक्रमक फलंदाजीने नामिबियाच्या संघाला २१० धावांचे आव्हान पुढे ठेवले.तर वरून चक्रवर्ती व अक्षर पटेल व अर्शदीप सिंगच्या आक्रमक गोलंदाजी पुढे नामिबियाच्या संघाने सर्व गडी बाद ११६ धावांवर गुडघे टेकले. भारतीय संघाने ९३ धावांनी नामिबिया क्रिकेट संघाचा पराभव केला.

- Advertisement -

नामिबियाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून ईशान किशन व संजू सॅमसन सलामीला फलंदाजीस आले. सलामीला आलेल्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजीस सुरुवात केली. सामन्याच्या दुसऱ्या षटकात बेन शिकांगोच्या गोलंदाजीवर लुरेन स्टीनकॅम्पने संजू सॅमसनला झेल बाद केले.संजू सॅमसनने ८ चेंडूत ३ षटकार व १ चौकार लगावत एकूण २२ धावा केल्या. पाचव्या षटका अखेरीस भारतीय संघाच्या एक गडी बाद ५६ धावा होत्या. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर ईशान किशन व तिलक वर्माच्या जोडीने धुवाधार फलंदाजी केली. सामन्याच्या आठव्या षटकाच्या पहिल्या चेंडूत गेरहार्ड इरास्मुसच्या गोलंदाजीवर बेन शिकोंगोने ईशान किशनला झेल बाद केले. ईशान किशनने २४ चेंडूत ५ षटकार व ६ चौकार लगावत एकूण ६१ धावा केल्या. ९ व्या षटकाच्या अखेरीस २ गडी बाद ११० धावा भारतीय संघाच्या होत्या.

सामन्याच्या ११ व्या षटकात बर्नार्ड स्कोल्टझच्या गोलंदाजीवर झेन ग्रीनने भारतीय संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादवला यष्टीचीत केले. सुर्यकुमार यादवने १३ चेंडूत १२ धावा केल्या. पाठो १२ व्या षटकात गेरहार्ड इरास्मुसच्या गोलंदाजीवर जे जे स्मितने तिलक वर्माला झेल बाद केले.तिलक वर्माने २१ चेंडूत २५ धावा केल्या. सामन्याच्या १९व्या षटकात गेरहार्ड इरास्मुसच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्याला बाद झाला. हार्दिक पंड्याने धुवाधार फलंदाजी करत २८ चेंडूत ५२ धावा केल्या.पाठोपाठ शिवम दुबे १६ चेंडूत २३ धावा करून बेन शिकांगोकरवी धावबाद झाला.रिंकू सिंगने १ धाव,तर अक्षर पटेल शून्य धाव संख्येवर बाद झाले. २० व्या षटकाच्या अखेरीस भारतीय संघाने ९ गडी बाद २०९ धावा करत नामिबियाच्या संघास २१० धावांचे आव्हान दिले.

लुरेन स्टीनकॅम्प व यान फ्रायलिंक नामिबियाच्या संघाकडून प्रथम फलंदाजीस आले.४ थ्या षटकात अर्शदीप सिंघच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने लुरेन स्टीनकॅम्पला झेलबाद करत नामिबियाच्या संघास पहिला धक्का दिला. लुरेन स्टीनकॅम्पने ८ चेंडूत ११ धावा केल्या. ८ व्या षटकात वरून चक्रवर्तीने लुरेन स्टीनकॅम्पला क्लीन बोल्ड करत नामिबियाच्या संघास दुसरा धक्का दिला. लुरेन स्टीनकॅम्पने २० चेंडूत २९ धावा केल्या

दहाव्या षटकात वरून चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने निकोल लोफ्टी-ईटनला झेल बाद केले.निकोलने १३ चेंडूत १३ धावा केल्या.पाठोपाठ जे जे स्मितला वरून चक्रवर्तीने क्लीन बोल्ड करत शून्यावर तंबूत माघारी पाठवत नामिबियाच्या संघाला चौथा धक्का दिला.११ व्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर तिलक वर्माने गेरहार्ड इरास्मुसला १८ धावांवर झेल बाद करत नामिबियाच्या संघाचा पाचवा खेळाडू बाद केला.१२ व्या षटकाच्या अखेरीस नामिबियाच्या संघाने ५ गडी बाद ९० धावा केल्या.

१३ व्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर जसप्रीत बुमराहने मलान क्रुगरला ५ धावांवर झेल बाद केले. १७ व्या षटकात जसप्रीत बूमराह ने रुबेन ट्रम्पेलमनला ६ धावांवर क्लीन बोल्ड करत नामिबियाच्या संघास सातवा धक्का दिला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने बर्नार्ड स्कोल्टझला ४ धावांवर झेलबाद करत तंबूत परत पाठविले.तर हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर बेन शिकोंगो पायचीत होत शून्यावर माघारी परतला. झेन ग्रीनने १९ चेंडूत ११ धावा करत शिवम दुबे करवी बाद होत नामिबियाच्या संघाचा खेळ आवरला. भारतीय संघाने नामिबियाच्या संघावर ९३ धावांनी विजय मिळविला.

ताज्या बातम्या

Shirdi : तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण...