Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाICC World Cup 2023 : विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल; आता 'या' तारखेला होणार...

ICC World Cup 2023 : विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल; आता ‘या’ तारखेला होणार भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना

मुंबई | Mumbai

आयसीसी (ICC) एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना १९ नोव्हेंबरला पार पडणार आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामन्यांचे आयोजन हे भारतातील एकूण १० शहरातील स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. त्यामध्ये विश्वचषकाचा सुरुवातीचा सामना आणि अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडिमवर (Narendra Modi Stadium) खेळविला जाणार आहे…

- Advertisement -

Monsoon Session : “राहुल गांधींनी फ्लाईंग किस दिला”; स्मृती इराणींचा गंभीर आरोप

आयसीसीच्या वेळापत्रकानुसार १५ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार होता. मात्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता हा सामना १४ ऑक्टोबर रोजी खेळविण्यात येणार आहे. त्याबरोबरच विश्वचषकातील आणखी नऊ सामन्यांच्या तारखेत आयसीसीने बदल केला आहे. त्याबाबतची माहिती आयसीसीने ट्विट करत दिली आहे.

…म्हणून शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही; नरेंद्र मोदींचं मोठं विधान

आयसीसीच्या नव्या वेळापत्रकानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबरला होणारा सामना हा १४ ऑक्टोबरला होणार आहे. तर भारत आणि नेदरलँड (India vs Netherlands) (क्वालिफायर १) यांच्यात ११ नोव्हेंबरला बंगळुरुत सामना पार पडणार होता. मात्र आता हा सामना १२ नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि नेदरलँड यांच्यातील हा सामना विश्वचषकाच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना असणार आहे.

दरम्यान, यंदाचा विश्वचषक १० संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार असून प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. या १० संघामधून पहिले ४ संघ हे सेमीफायनलमध्ये पोहचणार असून त्यातील दोन सामने हे मुंबईतील वानखेडे आणि कोलकातामधील ईडन गार्डनवर (Garden of Eden) होणार आहेत. तसेच पहिला सेमीफायनल सामना १५ नोव्हेंबर तर दुसरा सेमीफायनल सामना १६ नोव्हेंबरला होणार आहे. तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळविला जाईल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचं निधन

या नऊ सामन्यांत बदल

१० ऑक्टोबर – इंग्लंड vs बांगलादेश, सकाळी १०.३० वाजता

१० ऑक्टोबर – पाकिस्तान vs श्रीलंका, दुपारी २ वाजता

१२ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया vs दक्षिण आफ्रिका, दुपारी २ वाजता

१३ ऑक्टोबर – न्यूझीलंड vs बांगलादेश, दुपारी २ वाजता

१४ ऑक्टोबर – भारत vs पाकिस्तान, दुपारी २ वाजता

१५ ऑक्टोबर – इंग्लंड vs अफगाणिस्तान, दुपारी २ वाजता

११ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया vs बांगलादेश, सकाळी १०.३० वाजता

११ नोव्हेंबर – इंग्लंड vs पाकिस्तान, दुपारी २ वाजता

१२ नोव्हेंबर – भारत vs नेदरलँड, दुपारी २ वाजता

- Advertisment -

ताज्या बातम्या