Friday, February 6, 2026
Homeक्रीडाICC U19 IndvsEng: छोटा पॅकेट मोठा धमाका! १५ षटकार, १५ चौकार, ८०...

ICC U19 IndvsEng: छोटा पॅकेट मोठा धमाका! १५ षटकार, १५ चौकार, ८० चेंडूत १७५ धावा; वैभव सुर्यवंशीची ऐतिहासिक खेळी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अंडर 19 टीम इंडियाचा स्टार ओपनर बॅट्समन वैभव सूर्यवंशी याने इतिहास घडवला आहे. वैभव सूर्यवंशी याने अंडर 19 वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध विक्रमी स्फोटक फलंदाजी केली आहे. वैभवने या सामन्यात संयमी सुरुवात करत अर्धशतक झळकावले. मात्र, त्यानंतर वैभवच्या बॅटमधून आग ओकल्यासारख्या धावांचा पाऊस पडला. वैभव सुर्यवंशीने अवघ्या ५५ चेंडूत शतक ठोकले तर एकूण ८० धावांत १७५ धावांची स्फोटक फलंदाजी करत अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहे.

कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. वैभव आणि ॲरॉन जॉर्ज ही सलामी जोडी मैदानात आली. जॉर्ज झटपट बाद झाला. त्यानंतर वैभवने आयुषसह भारताचा डाव सावरला. या दोघांनी स्फोटक फलंदाजी केली. वैभवने या खेळीत ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले. तर ५५ चेंडूत शतकी खेळी केली. वैभवने ७२ चेंडूत दीडशतक पूर्ण केले. त्यामुळे वैभव सहज द्विशतक करेल, असे चित्र होते. मात्र वैभव दीडशतकानंतर आणखी काही धावा जोडून बाद झाला. वैभवने त्याच्या खेळीत ८० चेंडूत १५ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने २१८.७५ च्या सरासरीने १७५ धावा चोपल्या.

- Advertisement -

इस्लामाबादमधील मशिदीत नमाजादरम्यान बॉम्बस्फोट; १५ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

YouTube video player

ट्रव्हिस हेडचा विक्रम मोडला
वैभवची ही खेळी कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील (पुरुष, महिला आणि सर्व वयोगटातील) आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडच्या नावावर होता. हेडने २०२३ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १६३ चेंडूत १७४ धावा केल्या होत्या. वैभवने केवळ १४ वर्षांचा असताना हा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. अंडर १९ मध्ये शतक ठोकणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी उन्मुक्त चंद आणि मनजोत कालरा यांनी कमाल केली होती. पण वैभव सूर्यवंशीनं वेगवान शतक झळकावलं आहे.

वैभव सुर्यवंशीच्या नावे झालेले विक्रम
वैभव सूर्यवंशी याने आयपीएलनंतर अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही ऐतिहासिक कामगिरी केली. वैभव अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये शतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला.
वैभव सूर्यवंशी याने 55 चेंडूत शतक पूर्ण केलं. वैभव यासह अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत वेगवान शतक करणारा फलंदाज ठरला.
वैभव अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला.
वैभवने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज हा बहुमान मिळवला.
वैभवने या खेळीसह षटकारांचं शतकही पूर्ण केलं. वैभव अंडर 19 वनडे क्रिकेटमध्ये 100 शतकं झळकावणारा पहिला फलंदाज ठरला.

ताज्या बातम्या

मशिदीत

इस्लामाबादमधील मशिदीत नमाजादरम्यान बॉम्बस्फोट; १५ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील एका शिया मशिदीत (इमांबरा) आज (6 फेब्रुवारी) नमाज पढत असताना आत्मघातकी हल्ला झाला. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या...