Sunday, October 6, 2024
Homeब्रेकिंग न्यूजICC women's T-20 World Cup : भारताचा पाकिस्तानवर ६ गडी राखून शानदार...

ICC women’s T-20 World Cup : भारताचा पाकिस्तानवर ६ गडी राखून शानदार विजय

संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई आंतराष्ट्रीय मैदानावर झालेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात कर्णधार हरमन प्रीत कौरच्या २९ धावांच्या निर्णायक खेळीने भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला.

- Advertisement -

नाणेफेक जिंकून पाकिस्तानची कर्णधार संघाची कर्णधार फातिमा सनाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूत रेणुका सिंघच्या गोलंदाजीवर गुल फिरोजला क्लीन बोल्ड करत शून्य धाव संख्येवर माघारी पाठवत पाकिस्तानच्या संघास पहिला धक्का दिला. सामन्याच्या पाचव्या षटकात दीप्ती शर्माने सिद्रा अमीनला क्लीन बोल्ड करत आठ धावांवर तंबूत परत पाठविले.सातव्या षटकात अरुंधती रेड्डीच्या गोलंदाजीवर शैफाली वर्माने उमेमा सोहेलला ३ धावांवर झेल बाद केले.

सामन्याच्या दहाव्या शतकात श्रेयंका पाटीलच्या गोलंदाजीवर रिचा घोषने मुनीबा अलीला स्टंप आउट केले. मुनीबा अलीने २६ चेंडूत १७ धावा केल्या. सामन्याच्या १३ व्या शतकात अरुंधती रेड्डीच्या गोलंदाजीवर आलिया पायचीत होऊन चार धावा करत तंबूत परतली.सामन्याच्या १४ व्या शतकात आशा शोभनाच्या गोलंदाजीवर रिचा घोषणे फातिमा सनाला झेल बाद केले. फातिमा सनाने ८ चेंडूत १३ धावा केल्या. सामन्याच्या १५ व्या षटकात श्रेयंका पाटीलच्या गोलंदाजीवर शैफाली वर्माने तुबा हसनला शून्य धाव संख्येवर झेल बाद केले.सयेदा अरुब शहा ने १४ धावा तर नश्रा संधूने नाबाद ६ धावा केल्या.२० व्या षटका अखेर पाकिस्तानच्या संघाने ८ गडी बाद १०५ धावा केल्या.

भारतीय संघाकडून शैफाली वर्मा व स्मृती मंधना प्रथम फलंदाजीस आल्या.सामन्याच्या पाचव्या षटकात सईदा इक्बालच्या गोलंदाजीवर तुबा हसनने स्मृती मंधनास झेल बाद केले.स्मृती मंधनाने १६ चेंडूत ७ धावा केल्या.सामन्याच्या १२ व्या षटकात ओमिमा सोहिलच्या गोलंदाजीवर आलीय रियाजने शैफाली वर्माला झेल बाद केले. शैफाली वर्माने ३५ चेंडूत ३२ धावा केल्या.

१६ व्या षटकात फातिमा सनाच्या गोलंदाजीवर मुनीबा अलीने जेमायमाह रॉड्रिगेसला झेल बाद केले.जेमायमाह रॉड्रिगेसने २८ चेंडूत २३ धावा केल्या.हरमनप्रीत कौरने २४ चेंडूत २९ धावा करत जखमी झाल्याने १९ व्या षटकात मैदान सोडावे लागले.दीप्ती शर्माने ७ तर सजीवन सजनाने नाबाद ४ धावा केल्या. एकोनावीसाव्या षटकाच्या अखेरीस भारतीय संघाने ४ गडी बाद १०८ धावा व ७ चेंडू राखून पाकिस्तानच्या संघावर विजय मिळविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या