Monday, November 25, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023 साठी पाकिस्तान संघाची घोषणा! हसन अलीचे कमबॅक, नसीम शाहचा...

World Cup 2023 साठी पाकिस्तान संघाची घोषणा! हसन अलीचे कमबॅक, नसीम शाहचा पत्ता कट

दिल्ली | Delhi

भारतात 5 ऑक्टोबरपासून होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी (World Cup 2023) पाकिस्तान संघाची (Pakistan Team) आज (22 सप्टेंबर) घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील 15 सदस्यीय संघाची घोषणा करताना वेगवान गोलंदाज हसन अलीला (Hasan Ali) संघाता स्थान दिले आहे.

- Advertisement -

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाचे उपकर्णधारपद शादाब खानकडे सोपवण्यात आले आहे. तर संघातील प्रमुख युवा गोलंदाज नसीम शाहला संघात स्थान दिलं गेलं नाही. आशिया चषक सुरू असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी हसन अलीचा या संघात समावेश करण्यात आला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हसन अली जून 2022 पासून संघाबाहेर आहे. तो वेस्टइंडिजविरूद्ध आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी उतरला होता. आता नसीम शाहच्या अनुपस्थितीत त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या 60 सामन्यांमध्ये 91 गडी बाद केले आहेत. पाकिस्तानने हटके पद्धतीने संघाची घोषणा केली आहे. वर्ल्डकपसाठी संघात स्थान मिळवलेल्या खेळाडूंचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

पाकिस्तानचा संघ :

बाबर आझम (कर्णधार), इमाम उल हक, फखर जमान, अब्दुल्ला शफीक, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, शादाब खान, मोहम्मद नवाज, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, वसीम जूनियर आणि उसामा मीर.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या