Wednesday, June 26, 2024
Homeक्रीडाICC World Cup : विराट कोहली अस्वस्थ !

ICC World Cup : विराट कोहली अस्वस्थ !

विश्वचषकात पहिल्यांदाच शून्यावर बाद झाल्याने किंग कोहलीला राग अनावर झाला व त्याने ड्रेसिंग रुममध्ये आदळआपट केल्याचे सांगितले जाते. दोन-तीन दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यानंतरचा हा प्रकार क्रिकेट विश्वात चर्चेत आहे. सचिन तेंडूलकरच्या सर्वाधिक वन-डे 49 शतकांना गाठण्याच्या व हे रेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठ्यावर विराट आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाल्यावर चाहत्यांची निराशा झाली. या सामन्यात विराट कोहली नऊ चेंडू खेळूनही एकही धाव न काढता तंबूत परतल्याने त्याचा राग त्याने ड्रेसिंग रुममध्ये काढल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

डेविड विलीने विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ. विराट कोहलीकडून चाहत्यांना शतकाची अपेक्षा होती, पण कोहली गोल्डन डकचा शिकार झाला. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 48 शतके ठोकली आहेत. सचिनच्या शतकांची बरोबरी करण्यासाठी विराट कोहलीला एका शतकाची व सचिनचे रेकॉर्ड मोडण्यासाठी आणखी एका शतकाची गरज आहे. त्यामुळे लखनौच्या मैदानात विराट कोहली सचिनच्या शतकांशी बरोबरी करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण विराट कोहलीला एकही धाव काढता आली नाही, त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला.

विराट कोहलीही निराश झाला. बाद झाल्यानंतर विराट कोहलीला राग अनावर झाला होता. ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहलीने राग बाहेर काढला. विराट कोहलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विराट कोहली यामध्ये खुर्दीवर जोरात हाताने मारत असल्याचे दिसतेय. हा व्हिडीओ पाहिल्यावर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली तुफान फॉर्मात आहे. विराट कोहलीने तीन अर्धशतके आणि एक शतक ठोकले आहे. सहा सामन्यात 88 च्या सरसरीने 354 धावा केल्या आहेत. पण, विराट कोहली इंग्लंडविरुद्ध खातेही न उघडता बाद झाल्याने त्याच्या समर्थकांमध्ये निराशा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या