मुंबई | Mumbai
इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर (Oval Stadium) सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पहिले दोन दिवस भारतासाठी फार कठिण गेले. मात्र, भारताचा मराठमोळा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. भारताचा संघ संकटात असताना रहाणेने दमदार अर्धशतक केले.
अजिंक्य रहाणे याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final) भारताकडून पहिले अर्धशतक झळकावलेय. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला जमले नाही, ते रहाणेने करुन दाखवलेय. विराट, रोहितसह दिग्गजांना मागे टाक अजिंक्यने विक्रमाला गवसणी घातली आहे.
“मी धमक्यांची चिंता करत नाही, पण…”; जीवे मारण्याच्या धमकीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
नाणेफेक जिंकून प्रथम कांगारूंना फलंदाजीला बोलावलं अन् त्यांनी दीड दिवसातच ४६९ धावा ठोकल्या. वाटलं खेळपट्टी फलंदाजीला पोषक आहे मात्र कांगारूंनी दुसऱ्या दिवशीच भारताच्या पहिल्या डावत ५ बाद १५१ धावा अशी अवस्था करून ठेवली होती. मात्र बिकट परिस्थितीतून झुंजार खेळी खेळत अजिंक्य रहाणेने कांगारूंना तगडी फाईट दिली. त्याला रविंद्र जडेजाने ४८ धावांचे योगदान देत दमदार साथ दिली. मात्र ही भागीदारी फार काळ टिकली नाही.
अजिंक्य रहाणेला शार्दुल ठाकूरने अपेक्षित साथ दिली. शार्दुलने सुरूवातीच्या काळात थोडीशी बाचकत फलंदाजी केली. त्याला दोन-तीन वेळा ऑस्ट्रेलियाकडून झेल सुटल्याने जीवदानही मिळाले. इतकेच नव्हे तर एका चेंडूवर तो पायचीत झाला होता त्यावेळी पॅट कमिन्सचा नो बॉल असल्याने तो वाचला. त्यामुळे सत्र संपेपर्यंत त्याने रहाणेला भक्कम साथ दिली. या दोघांनी नाबाद १०८ धावांची भागीदारी केली.
अजिंक्य रहाणे याने कसोटीतील पाच हजार धावांचा टप्पाही पार केला असून भारताकडून कसोटीत पाच हजार धावांचा टप्पा पार करणारा १३ वा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, दिलीप वेंगसरकर, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद अझरुद्दीन, गुंडप्पा विश्वनाथ आणि कपिल देव यांनी केला होता. त्याशिवाय अखेरच्या चार फलंदाजासोबत सर्वाधिक १०० धावांची भागिदारी करण्याचा पराक्रमही रहाणेच्या नावावर जमा झालाय.
अर्थमंत्री सीतारामन यांच्या मुलीनं बांधली लग्नगाठ; जाणून घ्या कोण आहेत प्रतीक दोशी?
त्याआधी, रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांकडून भारताला खूप अपेक्षा होत्या, कर्णधार रोहित हाफ पिच चेंडूवर २६ चेंडूत १५ धावांवर बाद झाला. तर शुबमन गिल १३ धावांवर एका इनस्विंगवर आऊट झाला. तसाच पुजारादेखील १४ धावांवर त्याने चेंडू सोडला आणि तो क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर मिचेल स्टार्कच्या बाऊन्सर चेंडूवर विराट कोहली १४ धावांवर झेलबाद झाला. रहाणे आणि जाडेजा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली होती, पण जाडेजा ४८ धावांवर माघारी परतला. त्यामुळे १५०च्या आतच भारताने निम्मा संघ गमावला. पाठोपाठ भरतही ५ धावांवर बाद झाला.