दिल्ली । Delhi
भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) ने आज, ३० एप्रिल रोजी ICSE (दहावी) आणि ISC (बारावी) बोर्ड परीक्षांचे निकाल सकाळी ११ वाजता जाहीर केले. यंदा दोन्ही निकाल एकाच वेळी घोषित करण्यात आले. परीक्षांचे एकूण निकाल अत्यंत उत्साहवर्धक असून, मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.६४% तर मुलींचे ९९.४५% इतके आहे.
निकाल परिषदेकडून त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर cisce.org प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार आपली गुणपत्रिका वेबसाइटवरून थेट डाउनलोड करू शकतात. यासाठी परीक्षा रोल नंबर आणि रोल कोड आवश्यक आहे. तसेच, डिजिलॉकर अॅपचा वापर करूनही मार्कशीट सहज मिळवता येईल.
निकाल कसा पाहाल?
results.digilocker.gov.in या वेबसाइटला भेट द्या
CISCE निकाल विभाग निवडा
वर्ग निवडा आणि निकाल बटणावर क्लिक करा
इंडेक्स क्रमांक, युनिक आयडी आणि जन्मतारीख भरा
सबमिट करताच निकाल दिसेल
विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी इंटरनेटशिवाय एसएमएसचा पर्यायही उपलब्ध आहे. ISC निकालासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचा युनिक आयडी लिहून 09248082883 या क्रमांकावर पाठवावा. काही क्षणांतच विषयानुसार गुणांचा तपशील मिळेल.
ज्यांना त्यांच्या निकालांबाबत समाधान नसेल, त्यांनी जुलै २०२५ मध्ये कोणत्याही दोन विषयांची सुधारणा परीक्षा देता येईल. पुनर्मूल्यांकनासाठीही अर्ज करता येणार असून, यासाठी cisce.org या वेबसाइटवरील ‘Public Services’ विभागात जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येईल.
ISC (बारावी) परीक्षा १३ फेब्रुवारी ते ५ एप्रिल दरम्यान झाली होती, तर ICSE (दहावी) परीक्षा १८ फेब्रुवारी ते २७ मार्च या कालावधीत झाली. बारावीला १.०६ लाख आणि दहावीला २.५३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. निकालानंतर आता पुढील टप्प्यांवर विद्यार्थी आपले शैक्षणिक निर्णय घेणार आहेत.