Friday, April 25, 2025
Homeभविष्यवेधरत्नांची ओळख

रत्नांची ओळख

ज्योतिष शास्त्राचा सखोल अभ्यास नसलेले काही ज्योतिषी केवळ चंद्रराशीनुसार सर्वसामान्य रत्न सुचवितात, परंतु कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे महादशा / अंतर्दशा स्वामीच्या रत्नाला जास्त महत्त्व असते. ग्रहांची रत्ने किंवा त्या रंगाचे कपडे वापरण्याने ग्रहपीडा कमी होण्यास आणि ग्रहांपासून अधिक लाभ होण्यास मदत होते, या बाबत सर्वांचे एकमत आहे. याचाच अर्थ मुळात चांगले/वाईट जे काही घडते त्यात काही प्रमाणात वाढ व होणारा त्रास काही प्रमाणात कमी होतो.

रत्ने ग्रहांची सूक्ष्म रूपे आहेत. एखाद्या ग्रहापासून ज्या प्रकारची वैश्विक किरणे प्राप्त होतात. अगदी त्याच प्रकारची वैश्विक किरणे त्या ग्रहांच्या अस्सल रत्नापासून प्राप्त होतात. रत्न केवळ विक्रेत्याकडून खरेदी करून वापरू नये. ते धारण करणार्‍या व्यक्तीच्या नावाने सिद्ध करून (अभिमंत्रित करून) मगच वापरावे. अन्यथा अपेक्षित लाभ होत नाहीत. रत्नाचा स्पर्श शरीरास होणे आवश्यक असते म्हणून रत्न धारण करताना अंगठी किंवा लॉकेटची मागची बाजू मोकळी ठेवलेली असते. नऊ ग्रहांची नऊ प्रमुख रत्ने आहेत तर काही ग्रहांची उपरत्ने आहेत. अस्सल रत्ने किमतीने महाग असतात म्हणून अशावेळी उपरत्न सुचविले होते. नऊ ग्रहांची नऊ रत्ने प्रमुख आहेत.

कोणतेही रत्न वजनाने किमान 3 कॅरेटच्या पुढे यथाशक्ती खरेदी करावे, फक्त हिरा हे रत्न खूप महाग असल्यामुळे शक्य तो सेंटमध्ये सुचवावा. कोणतेही रत्न शुक्ल पक्षात त्या ग्रहाच्या नक्षत्रात / त्या ग्रहाच्या वारी त्या ग्रहाच्या होर्‍यात धारण करावे. धारण करण्यापूर्वी इष्ट देवतेला श्रद्धा पूर्वक नमस्कार करून रत्नावर निरसे दुध व गंगाजलाचा अभिषेक करावा. धूप दीप लावून पूजा करावी. त्या ग्रहाच्या मंत्राचा 108 जप करावा. परस्पर विरोधी रत्ने धारण करू नये असा एक संकेत आहे. परंतु नवग्रहांची अंगठी अपवाद आहे. रत्न हरविणे, फुटणे, रंग बदलणे असे झाल्यास धारकावरील महान संकट टळले अर्थात शुभ समजतात.

- Advertisement -

1) माणिक

माणिक हे रविचे रत्न असून या रत्नाला हिंदीत चुन्नी तर इंग्रजीत र्ठीलू म्हणतात. हे महत्त्वाकांक्षी लोकांचे रत्न म्हणून ओळखले जाते. सुख, संपत्ती, उच्च पद, प्रतिष्ठा, प्रेम, सन्मान इ. साठी हमखास वापरावे.

रंग – लाल गुलाबी (डाळिंबी), चॉकलेटी, निळसर, काळसर, हिरवट, धुरकट, पांढरट रंगाचेही असतात.

लग्न – मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक, धनु. सिंह लग्न असणार्यांनी आयुष्यभर माणिक वापरावा.

बोट- उजव्या हाताचे 3 रे बोट (अनामिका).

धातू- सोने, चांदी, पंचधातू.

रविचे मित्र ग्रह – चंद्र, बुध, मंगळ.

विकार- भौतिक पिडा (भूत प्रेत बाधा), हृद्य रोग, बेचैनी, धडधड, भय, भ्रम, अस्थिरता, छातीत कळा येणे, निर्बलता, स्मृतिभ्रंश, धाप लागणे, रक्तदाब, हार्टअ‍ॅटॅक इ.

प्रभाव कालावधी- 3 वर्षे.

रवीची नक्षत्रे- कृत्तिका, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा.

विरोधी रत्न – हिरा, नीलम, गोमेद

2) मोती

मोती हे चंद्राचे रत्न लोकप्रिय असून या रत्नाला इंग्रजीत झशरीश्र असे म्हणतात. मूर्ती लहान व कीर्ती महान अशी याची व्याख्या करतात. चंद्र मनाचा कारक ग्रह आहे म्हणून मन:शांतीसाठी व मनोबल वाढविण्यासाठी याचा वापर करावा. भावनांचा सोबती म्हणून बालकांसह सर्वांनाच लाभदायक असतो. कवी, लेखक, चित्रकार, संगीतकार इ. लोकांना विशेष लाभदायी. मोती वापरण्यासाठी कोणत्याही तज्ञाचा सल्ला घेण्याची आवश्यकता नाही.

रंग- सफेद (चंदेरी) काळे, पिवळे, गुलाबी, निळे, बदामी रंगाचेही असतात.

बोट- उजव्या हाताचे 4 थे बोट (कनिष्ठीका अर्थात करांगुली)

धातू- चांदी, पंचधातू.

चंद्राचे मित्र ग्रह- रवी, बुध.

विकार- त्रिदोष नाशक, हिस्टेरिया, अस्थिर मन, संताप, रक्तविकार, नेत्रविकार, वक्षपिडा, शारीरिक दुर्बलता, दृष्टीदोष, प्रदर, वीर्यदोष, पांडुरोग इ.

प्रभाव कालावधी- 2 वर्षे 2 महिने.

चंद्राची नक्षत्रे – रोहिणी, हस्त, श्रवण.

विरोधी रत्न- गोमेद.

3) पोवळे

पोवळे हे मंगळाचे रत्न आहे. पोवळ्याला हिंदीत मुंगा तर इंग्रजीत उेीरश्र म्हणतात. मोती व पोवळे समुद्रातून प्राप्त होतात म्हणून त्यांना ढवळ्या-पोवळ्याची जोडी म्हणतात. व्यवसाय वृद्धीसाठी व्यावसायिकांनी पोवळे हमखास वापरावे. धाडसी वृत्ती वाढविण्यासाठी उपयुक्त. 4,8,12 या स्थानात मंगळ असल्यास मंगळ दोषासाठी पोवळे वापरावे. क्रोधावर नियंत्रण व मन:स्वास्थ यासाठी पांढरे पोवळे वापरावे.

रंग- पोवळे लाल, गर्दलाल, पांढरा, फिक्कट पिवळा, फिक्कट गुलाबी, शेंदरी, निळ्या, काळ्या व भुर्‍या रंगाचेही असते.

बोट- उजव्या हाताचे 3 रे बोट (अनामिका).

धातू- तांबे, पंचधातू, चांदी.

मंगळाचे मित्र ग्रह- रवी, चंद्र, गुरू.

विकार- हृदयविकार, रक्तदाब, त्वचादोष, गर्भपाताची सवय, वांझपणा इ.

प्रभाव कालावधी- 3 वर्षे 3 दिवस.

मंगळाची नक्षत्रे- मृग, चित्रा, धनिष्ठा.

विरोधी रत्न- हिरा, गोमेद, नीलम.

4) पाचू

पाचू हे बुधाचे रत्न रत्नात सर्वश्रेष्ठ असून या रत्नाला हिंदीत पन्ना तर इंग्रजीत एाशीरश्रव म्हणतात. व्यवसाय वृद्धी व हमखास धनलाभासाठी पाचू वापरावा. पाचू कोणत्याही राशीच्या स्त्री, पुरुषांस वापरता येतो. पाप व भय नाश करतो. वाणी, बुद्धी, स्मरणशक्ती व कला क्रिडा कारक. चांगल्याला अधिक चांगले करणे व वाईट व्यक्तीस सन्मार्गावर आणणे. अंधारातून प्रकाशाकडे व प्रकाशातून प्रखर प्रकाशाकडे आणणे हा पाचूचा गुणधर्म असल्याने प्रत्येकाने एकदा तरी पाचू वापरून बघावा.

रंग- पोपटी, गर्द हिरवे (जास्त चांगले).

बोट- उजव्या हाताचे 4 ठे बोट (करांगुली).

धातू- कांसा, पंचधातू, चांदी इ.

बुधाचे मित्र ग्रह- रवी, शुक्र, गुरु.

विकार- दमा, धडधड, खोकला, बेचैनी, कोड, वातरोग, स्वप्नदोष, वाचादोष, वीर्यवर्धक, संतानप्राप्ती, त्वचाविकार, निद्रानाश, अडखळत बोलणे, झोपेत चालणे / घाबरणे / दचकणे, संशय, बाधा इ.

प्रभाव कालावधी- 3 वर्षे

बुधाची नक्षत्रे- आश्लेषा, जेष्ठा, रेवती.

5) पुष्कराज- पुष्कराज हे गुरुचे रत्न असून याला मनोवांच्छित फळ देणारा चिंतामणी मानतात. हिंदीत पुष्कराजला पुखराज व इंग्रजीत ढेरिू म्हणतात. पुष्कराज हे भाग्यशाली रत्न आहे. विद्या, ज्ञान, बुद्धी, मानसन्मान, वैभव, धनप्राप्ती, संतती सौख्य, प्रोफेसर, शिक्षक, राजकारणी व्यक्ती, अति महत्त्वाकांक्षी व्यक्ती, संकटावर मात इ. साठी पुष्कराज वापरावा. गुरूच्या महादशेत अंतर्दशेत पुष्कराज धारण करावा.

रंग- सोनेरी पिवळसर, पांढरा, हिरवट, निळसर. दुर्मिळ अशा गुलाबी रंगाच्या पुष्कराजला रंगीला रतन म्हणतात.

लग्न- धनु, मीन राशिच्या लोकांसाठी व नोव्हेंबर मध्ये जन्म झालेल्यांनी हमखास पुष्कराज वापरावा. कुंडलीत 5,6,8,12,या भावात गुरु असेल किंवा केंद्रस्थानी, लग्नात किंवा मेष, कर्क, धनु, मीन या भावात गुरु असेल तर पुष्कराज वापरावा. जन्म दिनांक 3,12,21,30 किंवा मुलांक 3 असेल तर पुष्कराज वापरावा. पुष्कराज सर्वांनाच फायद्याचा आहे.

बोट- उजव्या हाताचे 1 ले बोट (तर्जनी)

धातू- सोने, चांदी, पंचधातू.

मित्र ग्रह- रवी, चंद्र, मंगळ.

विकार- मानसिक आजार, मन:शांती, वेडेपणा, ताप, पोटदुखी, कावीळ, दमा, दंत विकार, डोळ्याचे विकार, किडनीचे विकार, कफ, आतड्यातील सूज, वरचेवर डोकेदुखी आदी विकारात रोगाची तीव्रता कमी होते.

प्रभाव कालावधी- 4 वर्षे 3 महिने 10 दिवस.

गुरुची नक्षत्रे- पुनर्वसू, विशाखा, पूर्वा भाद्रपदा.

विरोधी रत्न (ग्रह)- हिरा, नीलम.

6) हिरा- हिरा हे शुक्राचे रत्न असून या रत्नाला इंग्रजीत ऊळोपव म्हणतात. विवाह, वैवाहिक सौख्य, प्रेम विवाह, प्रणय सुख, सर्व प्रकारच्या कलाकारांसाठी, सौंदर्यासाठी हिरा उपयुक्त आहे. हिरे किमतीने खूपच महाग असल्यामुळे सामान्य लोकांना परवडत नाही. म्हणून हिरा कॅरेटमध्ये न सुचविता ज्याच्या त्याच्या ऐपती प्रमाणे सेंटमध्ये सुचविला जातो. वक्रांत हे हिर्‍याला समांतर उपरत्न आहे.

रंग – पांढरा, लालसर, पिवळा, बदामी, काळा, निळा, धुरकट, पूर्णपारदर्शी, हलकी निळसर झांक असलेला हिरा सर्वश्रेष्ठ मानतात.

लग्न- एप्रिल महिन्यात किंवा जन्मांक 6 किंवा 6,15,24 तारखेला जन्म असेल त्यांनी हिरा वापरावा. राशी स्वामी शुक्र असेल त्यांनी हिरा वापरावा.

बोट- उजव्या हाताचे 4 थे बोट (कनिष्ठीका अर्थात करंगुली)

धातू – चांदी, पंचधातू किंवा प्लॅटीनम लॉकेटमध्ये.

मित्र ग्रह – बुध, शनी.

विकार- पौरुषत्व, वीर्य, चामडी, संतती, मूत्रपिंड.

प्रभाव – कालावधी 7 वर्षे.

शुक्राची नक्षत्रे – भरणी, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा.

विरोधी रत्न (ग्रह)- माणिक, पोवळे, पुष्कराज.

7) नीलम- नीलम किंवा इंद्रनील हे शनीचे रत्न असून या रत्नाला इंग्रजीत डरिहिळीश म्हणतात. रंकाचा राव व रावाचा राजा बनविणारे महा विजयी, महा पराक्रमी रत्न नीलम, धन संपत्ती, दीर्घायुष्य व सामर्थ्य प्रदान करणारे रत्न आहे.

रंग – गडद निळा किंवा जांभळा.

लग्न – ज्यांचा जन्म सप्टेंबर महिन्यात असेल किंवा ज्यांचा जन्मांक 8 किंवा 9 असेल त्यांनी तसेच साडेसाती असण्यार्यानी नीलम वापरावा.

बोट- उजव्या हाताचे 2 रे बोट (मध्यमा).

धातू – लोखंड, चांदी, पंचधातू.

शनीचे मित्र ग्रह- शुक्र, बुध, राहू.

विकार- विषबाधा.

प्रभाव कालावधी – 5 वर्षे.

शनीची नक्षत्रे – पुष्य, अनुराधा, उत्तरा भाद्रपदा.

विरोधी रत्न (ग्रह)- माणिक, पोवळे, पुष्कराज.

8) गोमेद- अमृत रत्न गोमेद हे राहूरत्न म्हणून ओळखले जाते. इंग्रजीत या रत्नाला नळीलेप म्हणतात. 2 नं. ची वृत्ती, धंदा व त्यातून पैसा, अति उच्चपदस्थ, भ्रष्टाचार, लांच लुचपत, पिडा हरणे, बाधा हरणे, अस्वस्थता, अस्थिरता.

रंग- गोमुत्रासारख्या स्फटिकासारखा, कोको कलर, लालभडक हिरवा, नारंगी, पिवळी, निळा, अपारदर्शक, अर्धपारदर्शक, पारदर्शक.

लग्न – 1,4,5,7,9,10 भावातील राहू शुभ असतो. त्यांनी गोमेद वापरावा.

बोट- उजव्या हाताचे 2 रे बोट (मध्यमा).

धातू- पंचधातू, लोखंड, चांदी.

राहूचे मित्र ग्रह- बुध, शुक्र, शनी.

विकार- विनाकारण चिंता, संशयी मन, संधिवात, आग होणे, कोड, चक्कर येणे, फिट्स यासारख्या विकारांची तीव्रता कमी करण्यासाठी गोमेद वापरावा.

प्रभाव कालावधी- 3 वर्षे.

वजन – 6 कॅरेट.

राहूचे नक्षत्रे – आर्द्रा, स्वाती, शततारका.

विरोधी रत्न (ग्रह) – माणिक, मोती, पोवळे.

9) वैडुर्य (लसण्या)- वैडुर्य (लसण्या) हे केतूचे रत्न असून या रत्नाला हिंदीत लहसुनियाँ तर इंग्रजीत आय स्टोन म्हणतात. पराक्रम, तेज, आनंद, सुख, संपत्तीकारक व पिडानाशक रत्न.

रंग – हिरवा, निळा, पिवळा, तपकिरी, भुरा, पांढरट, पारदर्शक, अर्धपारदर्शक, अपारदर्शक, पांढरे सूत असलेले मांजरीच्या डोळ्याप्रमाणे दिसणारे चमकदार वैडुर्य (लसण्या) वापरावे.

बोट- उजव्या हाताचे 3 रे बोट (अनामिका).

धातू – पंचधातू, लोखंडे, चांदी.

मित्र ग्रह- बुध, शुक्र, शनी.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...