पुणे | Pune
पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणात तीघा संशयितांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. दरम्यान हे तीन्ही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असण्याची दाट शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटात तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या या तिघांची सखोल चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या ६० टीम पोलिसांनी तयार केल्या आहेत. एक आठवडा उलटून गेल्यानंतरही आरोपी मोकाट असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे सगळीकडून पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींचे स्केच तयार केले आहेत. शिवाय आरोपीची माहिती देणाऱ्याला १० लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून आतापर्यंत रेकॉर्डवरील ४०० गुन्हेगारांची झाडझडती केली आहे.
याप्रकरणी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिकी मदतीने पोलिसांचा तपास सुरु होता. पण मोबाईल फोनला रेंज नसल्याने आणि तब्बल दहा किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली होती. यानंतर बोपदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयिताचे एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी आलेल्या तरुणीवर काही दिवसांपूर्वी पुण्यातील बोपदेव घाटात अत्याचार करण्यात आला होता. तिच्या मित्राला देखील बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यात आता पोलिसांना यश आले आहे. तीन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. यातील तीघांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर इतर जणांचा शोध सुरू आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा