Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाCSK ने सोडलं तर या 4 टीम लावणार रैनावर बोली!

CSK ने सोडलं तर या 4 टीम लावणार रैनावर बोली!

मुंबई – Mumbai

आयपीएलच्या या मोसमासाठी सगळ्या 8 टीमना त्यांनी कायम ठेवलेल्या आणि सोडून दिलेल्या खेळाडूंची यादी आज जाहीर करावी लागणार आहे. या सगळ्यामध्ये क्रिकेट रसिकांना सर्वाधिक उत्सुकता सुरेश रैना बाबत आहे. सुरेश रैनाबाबत चेन्नईची टीम काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

मागच्यावर्षी एमएस धोनीसोबतच रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर आयपीएल खेळण्यासाठी तो युएईला गेला. पण कोरोना आणि बायो-बबलचं कारण देत रैना भारतात परतला. चेन्नईच्या टीमसोबत रैनाचे वाद झाल्याचंही बोललं गेलं. रैनाने 193 आयपीएल मॅचमध्ये 33.34 च्या सरासरीने आणि 137.14 च्या स्ट्राईक रेटने 5,368 रन केल्या. रैनाला सोडून दिलं, तर चेन्नईच्या खिशात आणखी 11 कोटी रुपये येतील.

आयपीएलच्या पहिल्या मोसमात विजय मिळवलेल्या राजस्थान ला पुन्हा कधीच तशी कामगिरी करता आली नाही. मागच्या मोसमातही त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली, त्यामुळे यावेळी राजस्थानची टीम त्यांचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला सोडू शकतं. जर टीमने स्मिथला काढून टाकलं, तर त्यांना नेतृत्व करण्यासाठी खेळाडूची गरज लागेल. त्यामुळे सुरेश रैनाचा अनुभव त्यांच्या कामी येऊ शकतो.

पंजाब

आयपीएलच्या मागच्या मोसमात केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांनी पंजाबला चांगली ओपनिंग करून दिली, पण मधल्या फळीत त्यांच्या बॅटसमनना संघर्ष करावा लागला, त्यामुळे ग्लेन मॅक्सवेल ला सोडून देऊन सुरेश रैनाचा पर्याय पंजाबच्या टीमपुढे उपलब्ध आहे.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर

पंजाबप्रमाणेच विराट कोहलीच्या बँगलोरलाही मधल्या फळीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बँगलोरची टीम विराट आणि एबी डिव्हिलियर्सवर अवलंबून आहे. मागच्या मोसमात ऍरोन फिंचकडून बँगलोरला बर्‍याच अपेक्षा होत्या, पण फिंचने विराटची निराशा केली. त्यामुळे बँगलोरची टीम रैनासाठी बोली लावून मधली फळी आणखी मजबूत करू शकते.

कोलकाता

आयपीएलच्या मागच्या मोसमात कोलकात्याच्या टीमलाही ओपनर आणि तिसर्‍या क्रमांकाच्या बॅटसमनची निवड करताना त्रास झाला. कोलकात्याच्या टीमसाठी रैना हा तिसर्‍या क्रमांकावर उपयुक्त ठरू शकतो.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या