Monday, March 31, 2025
Homeमनोरंजन"या" अभिनेत्रीची अमृता फडणवीसांवर टीका

“या” अभिनेत्रीची अमृता फडणवीसांवर टीका

यामुळे झाल्या अमृता फडणवीस ट्रोल

मुंबई | Mumbai

- Advertisement -

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. त्यातच महाराष्ट्र आणि बिहार सरकारमध्ये देखील आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच काल माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यात उडी घेत त्यांनी ट्विट द्वारे अप्रत्यक्षरित्या मुंबई पोलिसांवर निशाणा साधला आहे. आता त्यांना अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी उत्तर दिले आहे.

रेणुका शहाणे यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, “कृपया सुशांतच्या दुःखद मृत्यूचे राजकारण करू नका आणि मुंबई व येथील येथील लोकांबाबत चुकीच्या शब्दांचे उपयोग करू नका. तरीही आपल्याकडील माहितीचा उपयोग पोलिसांना ती माहिती देऊन करा. जर त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असत्या तर काहीही झालं असतं तरी त्या मुंबईबद्दल असे काही बोलल्या नसत्या. जेव्हा एल्फिस्टन पुल देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पडला होता. त्यात मुंबईचे नागरिक मृत्युमुखी पडले होते, तेव्हा त्यांनी मुंबई सुरक्षित नसल्याचे आणि हार्ट लेस होण्याबद्दल काहीच बोलल्या नव्हत्या.”

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharastra Kesari 2025 : सोलापूरचा वेताळ शेळके ६६ वा ‘महाराष्ट्र केसरी’;...

0
अहिल्यानगर अहिल्यानगरमधील कर्जत शहरात आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होते. महाराष्ट्र...