Thursday, June 13, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपच्या आमदाराची शिंदे गटावर टिका; म्हणाले, त्यांच्याकडे धनुष्यबाण तर...

भाजपच्या आमदाराची शिंदे गटावर टिका; म्हणाले, त्यांच्याकडे धनुष्यबाण तर…

कल्याण | Kalyan

- Advertisement -

कल्याण लोकसभा निवडणुकीवरुन (Kalyan Loksabha Constituency) भाजप-शिवसेनेमध्ये (BJP – Shivsena) मागे वाद उफाळून आलेला होता. त्यात आता पुन्हा एका वादाची ठिणगी पडली आहे. कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड (BJP Mla Ganpat Gaikwad) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना लक्ष्य करताना दिसत आहे. रविवारी गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर टीका केली होती.

यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्येच मुख्यमंत्री यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य करत, मी कोणाच्या बापाला बाप म्हणत नाही, अशा शब्दात त्यांनी टीकास्र सोडले.

Parliament Special Session : संसदेचे आजपासून विशेष अधिवेशन, कोणत्या मुद्दांवर होणार चर्चा?

“धनुष्यबाणापेक्षा रॉकेट चालतात. माझ्याकडे रॉकेट आहे. तेही आता चांगले काम करुन बाणाला उत्तर देऊ शकते. कल्याण पूर्वच्या जनतेचे हाल करणाऱ्यांचे आता नाव घेत नाही. मात्र, पुन्हा छेडण्याचा प्रयत्न केला, तर तेव्हा नाव घेऊन सांगेन. मी कोणाच्या बापाला बाप म्हणत नाही.

पुढे ते असे ही म्हणाले, पण, माझा निधी कोणाच्या कोणाच्या टेबलावर अडवून ठेवला होता, हेही जनतेला सांगणार आहे. कल्याण पूर्वमध्ये १२९ कोटींची कामे मी मंजूर करून आणली होती. परंतू, दुसऱ्यांचं नाव लावून ही कामे चालू आहेत,” असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला होता. सध्या सणांचा काळ आहे. पोलिसांना मोठा ताण येतोय. तरीही शिवसेनेच्या गुंडांना सुरक्षा पुरवली जात आहे, असा ठपका त्यांनी ठेवला.

Nashik Accident News : कार-कंटेनरचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला निधी आणत मंजूऱ्या मी घेतल्या. पण, तिथेही श्रेय घेण्यासाठी काहीजण पुढे आले. आपल्याला निवडणुकीत परत त्यांच्याबरोबर फिरायचे असल्याने काही गोष्टी बोलत नाही. एकदा लोकसभेची निवडणूक होऊद्या. माझ्यावर जेवढे आरोप करायचे आहेत, तेवढे करा. तुमच्या प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्याची ताकद माझ्यात आहे. तुम्ही मला उत्तर देऊ शकणार नाही,” असे म्हणत गणपत गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या