Thursday, June 20, 2024
Homeनाशिकनगरपालिका तलावात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

नगरपालिका तलावात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

इगतपुरीतील नगरपालिका तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची घटना घडली होती. या मुलाला मित्रांसह परिसरातील रहिवाशांनी पाण्याबाहेर काढून नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. आज सकाळी या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे…

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी शहरातील पंढरपूरवाडी येथे राहणारा सुजल हा आपले मित्र आणि भाऊ यांच्यासमवेत इगतपुरी येथील नगरपालिका तलावात पोहायला गेला होता.

दि. 4 ला रविवारी दुपारी 4 च्या सुमारास तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यामध्ये बुडाला. प्रत्यक्षदर्शीनी मदतकार्य करून त्याला बाहेर काढत इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर त्याला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने आज सकाळी उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला.

याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या