Thursday, June 13, 2024
Homeनाशिकस्वस्त धान्य घोटाळ्या प्रकरणी माजी सरपंचाची इगतपुरी न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

स्वस्त धान्य घोटाळ्या प्रकरणी माजी सरपंचाची इगतपुरी न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

घोटी | प्रतिनिधी

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील गडगडसांगवी येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असतांना उपसरपंच आणि ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडल्याची घटना मागील वर्षी घडली होती. या प्रकरणी माजी सरपंच अनिता लहांगे यांच्यावर वाडीव-हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी इगतपुरी न्यायालयात खटला सुरू होता.

मात्र माजी सरपंच अनिता लहांगे यांच्या विरोधात न्यायालयात पुरवठा अधिकारी, पोलीस प्रशासन व ग्रामस्थ यांच्या कडुन कोणताही ठोस पुरावा सादर करू शकले नाही. यामुळे इगतपुरी न्यायालयाने अनिता लहांगे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात आमच्या कुटुंबाची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी कट कारस्थान करून आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव रचला होता असा आरोप माजी पंचायत समिती सभापती गोपाळ लहांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

कितीही प्रयत्न केले तरी…; शेतकरी आत्महत्येवरुन जयंत पाटलांची सरकारवर टिका

या वरून हा सर्व प्रकार लहांगे कुटुंबाला राजकिय, सामाजिक जीवनातुन उठवण्यासाठी व मानसिक व आर्थिक हानी पोहचवण्याच्या अनुशंगाने या सर्वांनी मिळुन संगनमत व षढयंत्र रचून बदनाम करण्याचा डाव केला होता.

म्हणुन तत्कालीन पोलीस अधिक्षक सचिन पाटील, तहसिलदार परमेश्वर कासुळे, पुरवठा अधिकारी भरत भावसार, सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार, मनसेचे प्रदेश नेते प्रदीपचंद्र पवार यांच्यासह इतर कट कारस्थान करणाऱ्यां विरोधात न्यायालयात अट्रोसिटीसह अब्रु नुकसान भरपाईचा दावा दाखल करणार असल्याची माहिती माजी प. स. सभापती गोपाळ लहांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

G-20 Summit India: 200 तास चर्चा, 300 बैठका, 15 मसुदे; जी-२०चे पुढचे अध्यक्षपद ब्राझीलकडे

या पत्रकार परिषदेस माजी प. स. सभापती गोपाळ लहांगे, आदिवासी समाजाचे नेते हिरामण कौटे, आदिवासी सामजिक नेते संतोष रौंदळे, पंडीत खेताडे, शंकर गवळी, कैलास घारे, पांडुरंग क्षिरसागर आदी उपस्थित होते.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात माजी सरपंच अनिता लहांगे यांच्यावर तत्कालीन तहसिलदार परमेश्वर कासुळे, पुरवठा अधिकारी भरत भावसार, सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार, पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी राजकीय वरदहस्त यांच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा पाठपुरावा माजी सभापती गोपाळ लहांगे यांनी एक वर्ष केला होता. इगतपुरी न्यायालयाने सर्व तपासाअंती अनिता लहांगे यांना दोष मुक्त करतांना सर्व बाबींची पडताळणी केली. पोलीस अधिकारी यांच्या तपासात अनिता लहांगे यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारचा ठोस पुरावा आढळुन आला नाही.

विशेष म्हणजे स्वतः फिर्यादी यांनी न्यायालयासमोर लेखी जबाब देऊन अनिता लहांगे यांचा सदर गुन्ह्यात कुठल्याही प्रकारचा सबंध नसल्याचे न्यायालयात लिहुन दिल्याने न्यायालयाने अनिता लहांगे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या