Wednesday, July 24, 2024
HomeनाशिकNashik Crime News : सदोष मनुष्यवधासह खुनाच्या आरोपाखाली फरार असणाऱ्या चार संशयितांना...

Nashik Crime News : सदोष मनुष्यवधासह खुनाच्या आरोपाखाली फरार असणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इगतपुरी । प्रतिनिधी | Igatpuri

- Advertisement -

सदोष मनुष्यवधासह (Culpable Homicide) खुनाच्या (Murder) आरोपाखाली इगतपुरी पोलीसांनी (Igatpuri Police) आणखी चार संशयितांना अटक (Arrested) केली आहे. दि. ८ जून २०२३ रोजी कसारा घाटात (Kasara Ghat) मॉब लिंचिंगची (Mob Lynching) घडली होती…

या गुन्ह्यात फरार असलेले सुरज रामप्रताप परदेशी (२५) गणेश चंद्रकांत राऊत (२३) विकास शर्मा आणि धनराज परदेशी, रा. गिरजा माता गल्ली, इगतपुरी या चौघांना इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी अटक केली असून या संशयितांना (Suspects) सोमवार (दि. १६) रोजी इगतपुरी न्यायालयात ( Igatpuri Court) हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्यांत यापूर्वी पोलिसांनी ६ संशयितांना अटक केली आहे.

Accident News : समृध्दी महामार्गावरील अपघातातील मृतांची नावे आली समोर

याबाबत अधिक माहिती अशी की, शहापुर तालुक्यातील (Shahapur Taluka) विहीगाव येथून (दि.०८ जुन) रोजी एका टेम्पोत दोन गाई एक बैल व एक वासरू पडघा येथे पपू अतीक पड्डी (३६) अकील गुलाम गंवडी (२५) आणि लुकमान सुलेमान अंसारी (२५) रा. पडघा जिल्हा ठाणे हे तिघे जण घेऊन जात होते. त्यावेळी कारेगाव येथून त्यांच्या टाटा पिकअपमध्ये जनावरे घेऊन साक्षीदार प्रल्हाद शंकर पगारे रा. विहीगाव यांच्या घरासमोर थांबले होते.

यावेळी कारेगावकडून (Karegaon) १ झायलो, २ स्विफ्ट कार आणि ७ ते ८ मोटरसायकली घेऊन १५ ते २० जणांनी हा टेम्पो अडवून या टेम्पोतील तिघांना मारहाण (Beating)केली होती. त्यावेळी टेम्पोतील तिघांपैकी अकील गुलाम गंवडी हा पळून गेला होता. तर उरलेल्या दोघांना या लोकांनी टेम्पोसह कसारा घाटातील घाटनदेवी मंदिरासमोर (Ghatandevi Temple) आणून रात्रीच्या वेळेस पुन्हा मारहाण करायला सुरुवात केली होती. त्यावेळी टेम्पोतील लुकमान सुलेमान अंसारी हा जीव वाचवण्यासाठी घाटनदेवी मंदिरासमोर असलेल्या उंट दरीच्या दिशेने पळाला होता. यानंतर या टोळक्याने जखमी (Injured) अतिक हर्षद पड्डी याला आणि टेम्पो इगतपुरी पोलीसांच्या ताब्यात दिला होता.

Nashik Crime News : घोटी टोलनाक्यावर ‘इतक्या’ लाखांचा गुटखा जप्त; नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

त्यानंतर पोलिसांनी जखमी चालक यास ग्रामीण रुगणालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी लुकमान सुलेमान अंसारी हा गायब असल्याची तक्रार इगतपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यानंतर १० जून रोजी उंट दरीत लुकमान सुलेमान अंसारी याचा मृतदेह २५० फुट खोल दरीत आढळून आला होता. हा मृतदेह कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमच्या शाम धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच तासांच्या अथक परिश्रमाने रात्रीच्या वेळी बाहेर काढला होता.

यानंतर गोवंशाची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी पप्पू अतीक पड्डी आणि अकील गुलाम गंवडी यांच्यावर भारतीय प्राण्यांचा छळ आणि प्रतिबंधक अधिनियमासह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा भादवी कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या घटनेतील काही संशयित फरार झाले होते. त्यापैकी दोन संशयितांना पकडण्यात इगतपुरी पोलीसांना यश आले आहे.

Deshdoot Special : ड्रग्ज प्रकरण पोलीस आयुक्तांना भोवणार? बदलीची चर्चा; राजकारण जोरात, ठाकरे गटाचा मोर्चा

दरम्यान, या घटनेचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर, पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, उपअधिक्षक सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे करीत आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : मनसेच्या नाशिक शहराध्यक्षपदी सुदाम कोंबडे यांची नियुक्ती

- Advertisment -

ताज्या बातम्या