Friday, May 31, 2024
Homeमनोरंजनलग्न न करताच Ileana D’cruz झाली आई; शेअर केला बाळाचा पहिला फोटो

लग्न न करताच Ileana D’cruz झाली आई; शेअर केला बाळाचा पहिला फोटो

मुंबई । Mumbai

‘किक’, ‘रेड’, ‘बर्फी’, ‘मैं तेरा हीरो’, ‘रुस्तम’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारी बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्री इलियाना डिक्रुझ नुकतीच आई झाली आहे. तिने 1 ऑगस्ट रोजी आपल्या मुलाला जन्म दिला. बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या इलियानाने सोशल मीडियावर गोड बातमी शेअर करत ती आई असल्याचे सांगितले आहे. ३७ वर्षांची इलियाना डिक्रूज लग्न न करताच आई झाली आहे.

- Advertisement -

इलियानावर सध्या चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. बाळाचा फोटो शेअर करत तिने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याचं नाव सांगितलं आहे. ही पोस्ट करत तिने लिहिलं, ‘आमच्या लाडक्या मुलाचे जगात स्वागत करताना आम्हाला किती आनंद होत आहे हे कोणत्याही शब्दात सांगू शकत नाही. मन आनंदाने भरून आलंय. असं लिहीत तिने बाळाचा फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबतच त्याचं नावही लिहिलं आहे. तिच्या बाळाचं नाव आहे कोआ फिनिक्स डोलन. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, इलियानाने १८ एप्रिल रोजी तिच्या प्रेग्नंसीविषयी सगळ्यांना जाहीरपणे सांगितलं होतं. तिने बेबीबंपसोबत तिचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहिल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. तसंच लग्नापूर्वी इलियाना आई होणार असल्यामुळे या बाळाचे वडील कोण हे जाणून घ्यायची नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर काही दिवसांपूर्वीच इलियानाने तिच्या प्रियकराचा फोटोही रिव्हिल केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या