Saturday, June 13, 2026
HomeनगरCrime News : नऊ अवैध दारू गुत्त्यांवर बुलडोझर

Crime News : नऊ अवैध दारू गुत्त्यांवर बुलडोझर

पाच जणांवर गुन्हे दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील अवैध दारू विक्री आणि हातभट्टीच्या व्यवसायाविरोधात शहर पोलिसांनी कारवाई करत नऊ अनधिकृत दारू गुत्त्यांची शेड जमीनदोस्त केली. यासोबतच अवैधरित्या देशी-विदेशी दारू तसेच गावठी हातभट्टीची दारू विक्री करणार्‍या पाच जणांविरोधात कारवाई करून 20 हजार 785 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. शहरातील वाढत्या अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने ही धडक कारवाई केली. कारवाईदरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडगीळ पटांगण, भाजी मार्केट परिसरातील अतुल दातरंगे याचा गुत्ता, कल्याण रस्त्यावरील अमरधाम परिसरातील संतोष नवगिरे याचा गुत्ता, कायनेटिक चौकातील गणेश वंजारे याचा गुत्ता, बोल्हेगावमधील संतोष सरोदे, बबीता शिंदे व बाळासाहेब वाघमारे यांच्या ठिकाणांवरील शेड, तसेच तपोवन रस्ता परिसरातील आशिष लोखंडे, सुरज शिंदे आणि यशोदानगरातील पवार याच्या अनधिकृत दारू गुत्त्यांची शेड जमीनदोस्त करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून अवैधरित्या देशी व विदेशी मद्य तसेच गावठी हातभट्टीची दारू विक्री करणार्‍यांविरोधात कारवाई केली. त्यांच्याकडून 20 हजार 785 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तसेच अहिल्यानगर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Nashik News : पतीच्या निधनाचा धक्का असह्य, अवघ्या दोन तासांत पत्नीनेही...

0
मनमाड | Manmad पती-पत्नीचे नाते हे जन्मोजन्मीचे मानले जाते, सुख-दुःखात ते दोघेही नेहमी एकमेकांना साथ देताना दिसतात. मात्र, जिल्ह्यातील मनमाडमध्ये (Manmad) आपल्या पतीसोबत सावलीसारखी उभे...