Monday, August 17, 2026
HomeनगरPathardi : अवैध दारू अड्डयावर छापा; 700 लिटर कच्चे रसायन नष्ट

Pathardi : अवैध दारू अड्डयावर छापा; 700 लिटर कच्चे रसायन नष्ट

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी पोलिसांनी अवैध दारूविरोधात कारवाई करत शंकरवाडी येथील गोपाळ वस्ती परिसरातील गावठी हातभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत सुमारे 1 लाख 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

मंगळवारी (दि.3) पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गोपाळ वस्ती, शंकरवाडी (ता. पाथर्डी) येथील शिवारात छापा टाकला. या कारवाई दरम्यान जालिंदर दत्तात्रय लोणारे (वय 22, रा. गोपाळ वस्ती, शंकरवाडी) याच्या ताब्यातील गावठी हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. छाप्यामध्ये 700 लिटर कच्चे रसायन (किंमत 70 हजार रुपये), 150 लिटर तयार गावठी दारू (किंमत 30 हजार रुपये), नवसागराच्या सहा वड्या तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 1 लाख 340 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

पोलिसांनी कच्चे रसायन जागीच नष्ट केले असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, देवराव ढगे, संदिप कानडे, संदिप कळमकर, भगवान टकले, गोविंद दराडे, होमगार्ड किसन सदामत, ज्ञानदेव बडे यांनी केली.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...