Tuesday, March 25, 2025
Homeनगरअवैध व्यवसाय सुरू असलेल्या टपर्‍या जमीनदोस्त

अवैध व्यवसाय सुरू असलेल्या टपर्‍या जमीनदोस्त

एमआयडीसीतील विविध भागांमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील विविध भागांमध्ये मंगळवारी (05 मार्च) अतिक्रमणविरोधी मोहीम राबवून अवैध व्यवसाय करणार्‍या टपर्‍यांवर कारवाई करण्यात आली. सनफार्मा चौक ते निंबळक चौक तसेच एमआयडीसीमधील एम ब्लॉक, एल ब्लॉक, जी ब्लॉक आणि वखार महामंडळ परिसरात ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

एमआयडीसी परिसरात रस्त्याच्या बाजूला अवैध व्यवसाय करणार्‍या टपर्‍या उभ्या राहिल्या आहेत. त्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत होती. एमआयडीसीतील अवैध व्यवसायांमुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. तसेच अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळेच एमआयडीसी प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली. यापूर्वीही अशाच प्रकारे अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली होती. भविष्यातही असे अतिक्रमण रोखण्यासाठी सातत्याने कारवाई केली जाईल, असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले.

ही संयुक्त कारवाई एमआयडीसीचे उपअभियंता संदीप बडगे, ट्रेसर अनिल पांढरे, सहाय्यक आरेखक प्रदीप शिरसाठ, तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी अंमलदार टेमकर, चव्हाण, आढाव, शेरकर आणि जाधव यांनीही मोहिमेत सहभाग घेतला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...