Saturday, July 27, 2024
Homeनगरअवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा; तोफखाना पोलिसांची सावेडीत कारवाई

अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा; तोफखाना पोलिसांची सावेडीत कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगरातील सोनानगर चौकात अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांनी सोमवारी (दि. 18) दुपारी छापा टाकून कारवाई केली. गॅस सिलेंडर, गॅस रिफिलिंग मशीन, वजन काटा असा सुमारे 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

पोलीस अंमलदार शिरीष तरटे यांच्या फिर्यादीवरून सनी दत्ता शिंदे (वय 20 रा. वैदुवाडी, पाईपलाईन रस्ता, सावेडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनानगर चौका जवळ मोकळ्या मैदानात सनी शिंदे अवैधरित्या भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅस टाक्यातून गॅस काढून तो एलपीजी वाहनामध्ये अनधिकृत रिफिलिंग करीत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.

गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, अहमद इनामदार, दत्तात्रय कोतकर, सतीश भवर, तरटे यांनी दोन पंचासमक्ष सोमवारी दुपारी एकच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला. वीज बोर्डला मशीन जोडून अवैधरित्या गॅस रिफिलिंग केले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हे सेंटर चालविणारा सनी शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेत तेथील सर्व साहित्य जप्त केले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

यापूर्वीही झाली होती कारवाई

सावेडी उपनगरात अनेक ठिकाणी अवैध गॅस रिफिलिंग सेंटर सुरू आहे. यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरवठा विभाग व पोलिसांनी अनेक वेळा कारवाई केली असली तरीही हे सेंटर पुन्हा सुरू होते. जून 2022 मध्ये पुरवठा विभागाने सनी शिंदे याच्या सोनानगर चौकातील सेंटरवर छापा टाकला होता. त्याने पुन्हा त्याच ठिकाणी बस्तान बसविले होते. पोलिसांनी त्यावर पुन्हा कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या