Tuesday, March 25, 2025
Homeनगरअवैधरित्या खडी वाहतूक करणारी तीन वाहने जप्त

अवैधरित्या खडी वाहतूक करणारी तीन वाहने जप्त

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील नांदूरखंदरमाळ (Nandurkhandarmal) परिसरामध्ये अवैध खडी वाहतूक (Illegal Gravel Transport) करणारे दोन डंपर (Dumper) आणि एक टेम्पो (Tempo) महसूल पथकाने जप्त (Revenue Team Seized) केला आहे. सदर वाहने ही घारगाव पोलीस ठाण्यात (Ghargav Police Station) जमा करण्यात आली आहे.

- Advertisement -

पुण्यातून बेपत्ता असलेल्या कोपरगावच्या तरुणीचा गुढ मृत्यू

संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे व तहसिलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार उमाकांत कडनोर, तलाठी युवराजसिंह जारवाल यांचे पथक नांदूरखंदरमाळ परिसरामध्ये अवैध वाळू उपसा (Illegal Sand Mining) आणि गौण खनिज उत्खनन (Minor Mineral Mining) संदर्भात गस्त घालत असतांना त्यांना टेम्पो क्रमांक एम. एच. 17 बी वाय 7559, डंपर क्रमांक एम. एच 17 ए जे 5438, डंपर क्रमांक एम. एच. 17 बी. वाय 2788 ही वाहने मिळून आली.

स्टंटबाजी करून श्रीरामपूरच्या पुढार्‍यांनी
तालुक्याचे वाटोळे केले- ना. विखे

सुनिल गंगाधर आहेर, (रा. गणोरे, ता. अकोले) आणि एन. के. गाडे (रा. संगमनेर) यांची ही वाहने असून त्यांच्याकडे खडीवाहतूक (Gravel Transport) करण्याचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधीत वाहने घारगाव पोलिसांच्या (Ghargav Police) ताब्यात देण्यात आली आहे. सदर वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नायब तहसिलदार उमाकांत कडनोर यांनी सांगितले.

व्यापार्‍यास लुटणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना दोन तासात अटक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली....