येवला । प्रतिनिधी Yeola
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने येवला तालुक्यातील आडगाव शिवारात छापा टाकून अवैध दारू निर्मिती कारखाना उध्वस्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्र.०२ (सटाणा जि. नाशिक) यांनी मिळालेल्या बातमीवरून रविवारी, (दि. ५) संशयीताच्या शेत जमीनीमध्ये नाल्या शेजारी, (गट नं. ३६८/१/१, निकम वस्ती, आडगाव रेपाळ शिवार ता. येवला) या ठिकाणी छापा टाकला. छाप्यात अवैध दारु निर्मितीचे साहित्य, २५० लि. क्षमतेचे ०५ प्लॅस्टिक ड्रम स्पिरीटने भरलेले, रॉकेट संत्रा दारु ९० मि. ली. क्षमतेचे एकुण १५० बॉक्स, विना लेबल ९० मि.ली. क्षमतेचे रॉकेट संत्रा देशी दारुचे बुचे असलेले एकुण ३० बॉक्स असे एकुण १८० बॉक्स, एक बॉटलींग मशीन, देशी दारु रॉकेट संत्राचे एकुण ०६ रोल, देशी दारु रॉकेट संत्राचे एकुण ५०० जिवंत बुचे, १ एचपीच्या एकुण तीन इलेक्ट्रीक पाणी मोटार, ५०० ली. क्षमतेच्या अंदाजे २५० लि. तयार देशी दारु ब्लेन्ड, एक १००० लि. क्षमतेचा मद्यार्क वासाची रिकामी टाकी, २५० लि. क्षमतेचे मद्यार्क वासाचे एकुण ०७ रिकामे ड्रम, दहा प्लॅस्टीक ट्रे, रॉकेट नावाचे २०० रिकामे कागदी खोके, १०० फुट सर्व्हिस वायर, दोन मोबाईल, एक पांढऱ्या रंगाची बोलेरो वाहन ( क्र. MH- १५ BS-४५४५) असे एकुण रुपये १७ लाख ६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यावेळी रामभाऊ प्रभाकर निकम (रा. आडगाव रेपाळ शिवार ता. येवला), राहुल धर्मा डगळे (रा. मोहेगाव ता. नांदगांव) या दोन संशयीत आरोपीना ताब्यात घेण्यात आले. यांचेसह एक संशयित फरार नारायण ढोकळे (मेजर) यांचे विरूध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम चे कलम ६५ (a), (b), (d), (e), (१) ८०, ८१, ८३, ९० व भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
सदर कारवाई निरीक्षक चंद्रकांत हरी पाटील, प्रकाश आ. घायवट, प्रभारी निरीक्षक अमोद भडागे, दुय्यम निरीक्षक मनिष पाटील, प्रविण रा. मंडलिक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अवधुत पाटील, जवान सुनिल टापरे, मुकेश निबेंकर, विठ्ठल हाके, संतोष मुंढे गणेश शेवये, राजेंद्र चव्हाणके, योगेश म्हस्के, अनिल जाधव, विरसिंग पावरा, विजय पवार, संतोष बोन्हाडे व जवान नि-वाहन चालक गोकुळ शिंदे व दिपक नेमणार यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदर गुन्हयाचा अधिक तपास प्रभारी निरीक्षक अमोद भडागे हे करीत आहेत.