पाचोरा – प्रतिनिधी pachora
पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथे दि.१७ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तीन ट्रक यात सहा ब्रास मुरूम व एक डंपर यात चार ब्रास मुरूम ने भेरलेले असे अनधिकृतरित्या मुरूम गौण खनिजाची वाहतूक करतांना आढळून आले.
सदर वाहन चालकांजवळ गौण खनिज वाहतुकीचा अधिकृत परवाने मगितले असता त्यांच्या कडे महसूल विभागाच्या अधिकृत परवानग्या मिळाल्या नाही .आढळून सदर वाहने बी.एन.इन्फ्रा.कन्स्ट्रक्शन यांचे मालकीचे आहे. गोणखणीजाची अनधिकृत रित्या वाहतूक केली म्हणून त्यांवर महसूल विभागाचे मंडळ अधिकारी डी.आर.पाटील, प्रशांत पवार, सागर बागुल यांनी पंचासमक्ष पंचनामा करून पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी चारही वाहनांना पाचोरा पोलीस लाईन येथे जप्त करून ठेवण्यात आलेले आहे.
पाचोरा तहसील विभागास पंचनामाची कागदपत्रे व माहिती देण्यात आलेली आहे. तर सदर कन्स्ट्रक्शन कंपनी ही नवीन होत असलेल्या तिसऱ्या रेल्वे रुळाच्या कामासाठी मुरूम पुरवठा काम करीत असून मोठ्या प्रमाणात गैरकारभार होऊन मोठा गौण खनिज साठ्याची चोरी होत असल्याची चर्चा गावात सुरू आहे. गावातील गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लावणाऱ्या या मुरूमचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे डोळेझाक व दुर्लक्ष करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाचोरा तारखेडा पाच किमि अंतराचा रस्ता हा रेल्वे रुळाच्या कामामुळे पूर्णतः खराब झालेला असून पावसाळ्यात येथील प्रवासी वर्गाला फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. याच तारखेडा गावातील गावकऱ्यांना खराब, चिखलमय, पाणी साचलेल्या खराब रस्त्यावरून जाण्या येण्यासाठी भर पावसात चिखलातून वाहने काढतांना तारेवरची कसरत आणि जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.
या चिखलमय रस्त्यावर ठिकठिकाणी थोडा मुरूम टाकून द्यावा अशी विनंती वारंवार करून देखील या मुजोर कंपनीवाल्यांनी एक ब्रास मुरूम देखील पाणी साचलेल्या व चिखल झालेल्या जागेवर टाकून गावकऱ्यांना दिलासा दिला नाही. मात्र सर्रासपणे याच गावातून याच गावकऱ्यांच्या हद्दीतील गौण खनिजाची विल्हेवाट लावताना या गावकऱ्यांची आठवण झाली नाही. गावकऱ्यांना चिखलात तुडविणाऱ्या मुजोर पुरवठादार कंपनीवर मोठी कारवाई व्हावी अन्यथा शांततामय आंदोलन करण्यासाठी पुढील दिशा ठरवू असे येथील गावकऱ्यांनी सांगितले. तर महसूल विभागाच्या प्रांताधिकारी, तहसीलदार पुढील काय !आणि किती दनदात्मक कार्यवाही करतात की, पळवाटा काढून हे डंपर व ट्रक असेच सोडून दिले जातात याकडे लक्ष लागून आहे.