Wednesday, March 26, 2025
Homeनगरअवैध सावकारकीतून बळकावले घर; महिलेविरुद्ध गुन्हा

अवैध सावकारकीतून बळकावले घर; महिलेविरुद्ध गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

व्याजाने (Intrest) घेतलेल्या 60 हजार रूपयांच्या बदल्यात एक लाख 50 हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम देवून देखील दमबाजी करून एका व्यक्तीचे घर नावावर करून घेतल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी अवैध सावकारकी (Illegal Moneylending) करत असलेल्या महिलेविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शांता बाळासाहेब वाघ (रा. लांडेगल्ली, नालेगाव, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे. उप निबंधक सहकारी संस्था नगर तालुक्याचे सहकार अधिकारी (श्रेणी 2) शेख अलताफ अब्दुलकादर (वय 42 रा. आलमगीर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. शंतनु सतीष दळवी (रा. बागडे मळा, बालिकाश्रम रस्ता) यांनी उप निबंधक सहकारी संस्था नगर तालुका यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी नमूद केले होते की, ‘शांता बाळासाहेब वाघ हिच्याकडून 60 हजार रूपये घेतले होते. त्याचे व्याज (Intrest) व मुद्दलाचे एक लाख 50 हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम दिली होती. तरी देखील शांता वाघ हिने दळवी यांच्या घरी गुंड व दादा लोक पाठवून दमबाजी करून राहते घर तिने तिच्या नावावर करून घेतले होते.

तसेच अजून रक्कमेची मागणी करून जिवे मारण्याची धमकी (Threat) देत आहे’. दरम्यान उपनिबंधक कार्यालयात यावर सुनावणी झाली. तसेच उप निबंधक कार्यालयातील पथकाने शांता वाघ हिच्या घराची झडती घेऊन मिळालेल्या कागदपत्रांची शहानिशा केली असता सदरचा व्यवहार हा सावकारकीच्या पैशातून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर शांता वाघ विरूध्द महाराष्ट्र सावकारी अधिनियम (नियमन) 2014 चे कलम 39 नुसार गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...